Headlines

हे झाड घरापासून दूरच लावा, दिसताच साप होतो आकर्षित, पावसाळ्यात तर सापांचं हक्काचं घर

हे झाड घरापासून दूरच लावा, दिसताच साप होतो आकर्षित, पावसाळ्यात तर सापांचं हक्काचं घर
हे झाड घरापासून दूरच लावा, दिसताच साप होतो आकर्षित, पावसाळ्यात तर सापांचं हक्काचं घर


भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आहेत, त्यातील अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच प्रजाती या विषारी आहेत. विषारी सापांच्या प्रजातीमध्ये नाग, फुरसे मण्यार, घोणस, या प्रमुख चार सापांचा समावेश होतो. या सापांच्या प्रजातींना बिग फोर असं देखील म्हटलं जातं. विशेष म्हणजे या चारही प्रजाती महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये आढळून येतात. समाजामध्ये सापांबद्दल अनेक गैरसमज आहेत, या गैरसमजांमुळे सापांना मारण्याचं प्रमाण देखील जास्त आहे. त्यामुळे आज भारतामधून सापाच्या अनेक दुर्मिळ जाती या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु असं करू नये, जर तुम्हाला साप दिसला तर त्याची माहिती सर्पमित्रांना द्या, ते सापांना पकडून त्यांच्या सुरक्षीत अधिवासात सोडतील.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकांना बाग कामाची आवड असते, पावसाळ्यात लावलेली रोप लवकर रुजतात, म्हणून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक जण बागेत, आपल्या घरात विविध प्रकारची झाडं लावतात. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का? की अशी देखील काही झाडं आहेत, ज्या झाडांमुळे तुमच्या घराकडे साप आकर्षित होऊ शकतात? त्यामुळे अशी झाडं ही घरापासून थोडी दूर अतंरावरच लावावीत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापांच्या बिळात पाणी शिरतं त्यामुळे साप बिळातून बाहेर पडतात, पावसाळ्यात साप नेहमी कोरड्या आणि अंधाऱ्या जागेचा अश्रयासाठी शोध घेत असतात. त्यामुळे ते अनेकदा तुमच्या घरात देखील घुसू शकतात. त्यामुळे पावसाळ्यात नेहमी सावध राहिलं पाहिजे. तसेच रस्त्याने चालताना देखील नेहमी आजुबाजुला लक्ष ठेवलं पाहिजे.

नागचाफा ही एक अशी वनस्पती आहे, जिच्याकडे पावसाळ्यात साप आकर्षित होतात. नाग चाफ्याची पान ही प्रचंड मोठी असतात, या पानाखाली दडून बसल्यास सापांना पाऊस लागत नाही. तसेच या झाडाच्या पाणाखालची जमीन देखील कोरडी असते. त्यामुळे सापांना लपण्यासाठी हे झाड एक सुरक्षित आश्रयस्थान वाटतं, त्यामुळे साप या झाडाकडे आकर्षित होतात. या नागचाफ्याला सुंदर अशी पांढरी सुवासिक फुलं येतात. परंतु या झाडामुळे घरात साप येण्याचा धोका असल्यामुळे अशी झाडं ही घरापासून थोडी दूर अंतरावरच लावावीत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *