Headlines

‘हे’ पदार्थ तुम्ही जुने झाले तरी खाऊ शकता, ते कधीच खराब होत नीहीत

‘हे’ पदार्थ तुम्ही जुने झाले तरी खाऊ शकता, ते कधीच खराब होत नीहीत
‘हे’ पदार्थ तुम्ही जुने झाले तरी खाऊ शकता, ते कधीच खराब होत नीहीत


आपण बाजारातून किंवा माॉलमधून अनेक पदार्थ घेत असतो. पण ते पदार्थ आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे की आपल्याला बहुकेतदा माहिती नसतं. पण काही पदार्थ असे आहेत, जे कधीच खराब होत नाहीत, ज्याचा आपल्यास काहीही धोका नसतो… सांगायचं झालं तर, आपण खरेदी करत असलेल्या बहुतेक खाद्यपदार्थांवर एक विशिष्ट ‘समाप्तीची तारीख’ असते. पण आपल्या स्वयंपाकघरात असे काही खाद्यपदार्थ आहेत, जे योग्य प्रकारे साठवल्यास अनेक वर्षे, किंबहुना दशकेसुद्धा टिकू शकतात. अशात जाणून घ्या कोणते आहेत पदार्थ …

मीठ: खाणीतून मिळणारे खनिज असल्यामुळे मीठ कधीही खराब होत नाही. प्राचीन काळापासून इतर खाद्यपदार्थ टिकवण्यासाठी मिठाचा वापर केला जात आहे. हवाबंद डब्यात ओलाव्यापासून दूर ठेवल्यास मीठ कायम ताजे राहते.

पांढरा तांदूळ: अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कोंडा काढलेला पांढरा तांदूळ न खराब होता 30 वर्षांपर्यंत टिकू शकतो. मात्र, तपकिरी तांदूळ किंवा कोंडा काढलेली इतर धान्ये इतका काळ टिकत नाहीत, कारण त्यातील तेलकटपणामुळे ते लवकर खराब होऊ शकते.

वाळलेली कडधान्ये: वाटाणा, राजमा आणि चणे कोरड्या स्थितीत अनेक वर्षे साठवून ठेवता येतात. त्यांचे पौष्टिक मूल्य कालांतराने बदलत नाही, फक्त त्यांना शिजायला जास्त वेळ लागतो.

व्हिनेगर: व्हिनेगरमधील उच्च आम्लतेमुळे ते खराब होत नाही. अनेक वर्षांनंतरही त्याची चव आणि गुणवत्ता बदलत नाही. म्हणूनच लोणची खराब होऊ नयेत म्हणून त्यात व्हिनेगर मिसळले जाते.

शुद्ध तूप: व्यवस्थित वितळवलेले तूप हवाबंद डब्यात ठेवल्यास अनेक वर्षे टिकू शकते. त्यासाठी फक्त ते ओलाव्यापासून दूर ठेवणे आवश्यक आहे.

कॉर्नस्टार्च: ओलाव्यापासून दूर ठेवल्यास, कॉर्नस्टार्च कितीही काळ वापरता येतो. त्याचे फायदे कधीच कमी होत नाहीत.

व्हॅनिला अर्क: शुद्ध व्हॅनिला अर्क त्याच्या अल्कोहोलच्या प्रमाणामुळे कधीही खराब होत नाही. मात्र, हे लक्षात ठेवा की बाजारात मिळणारे कृत्रिम व्हॅनिला अर्क जास्त काळ टिकत नाहीत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *