Headlines

26 तारखेला त्यांनी बैल कापला तर आम्ही 27 तारखेला…, संग्राम जगताप यांचा थेट मोठा इशारा, वातावरण तापणार

26 तारखेला त्यांनी बैल कापला तर आम्ही 27 तारखेला…, संग्राम जगताप यांचा थेट मोठा इशारा, वातावरण तापणार
26 तारखेला त्यांनी बैल कापला तर आम्ही 27 तारखेला…, संग्राम जगताप यांचा थेट मोठा इशारा, वातावरण तापणार


बीड जिल्ह्यातल्या नेकनूरमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चाला आमदार महेश लांडगे आणि आमदार संग्राम जगताप यांची देखील उपस्थिती आहे. दरम्यान जन आक्रोश मोर्चानंतर आयोजित सभेमध्ये बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता वातावरण तापण्याची शक्यता आहे. शुरूवात वो लोग करते है लेकीन खत्म हम करते है. जनगणना झाली तर यांची संख्या 40 कोटींच्या पुढे जाईल. 6 वर्षांच्या मुलीपर्यंत येण्याची त्यांची हिंमत झाली. ही विचारधारा हिंदूत्ववादी लोकांनी विसरता कामा नये. तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये आले, त्यांनी दगडफेक केली, हे लोक भयभीत करतात. परंतु या झुरळांना आता घाबरण्याची गरज नाही, असं यावेळी संग्राम जगताप यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की,  पोलीस प्रशासनाला आजच सांगतो. 26 तारखेला बैल कापला गेला तर 27 तारखेला इथे आम्ही येऊ. तुम्ही जरा खबरदारी घ्या. राजकीय पक्ष जरी काम करत नसले तरी आपल्याला हिंदू म्हणून काम करावं लागेल. या लोकांशी कुठलाही आर्थिक व्यवहार करायचा नाही, हा कायदा आपण करून टाका, हे आपल्याला ठरवावं लागणार आहे. आपलं संघटन कायम ठेवा,  हिंदू समाज कधीही थांबणार नाही, असं यावेळी संग्राम जगताप यांनी म्हटलं आहे.

महेश लांडगे काय म्हणाले? 

सहा वर्षांच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न होतो, पण मदत होत नाही. सर्वधर्म समभावचा बुडबुडा बाहेर काढा. जो कायदे मानणार नाही, त्यासाठी दांडे हातात घ्या. आपल्यामध्ये काही पुरोगामी विचारांचे किडे आहेत. पुरोगामी विचाराच्या राजकीय लोकांना लाज वाटली पाहिजे. आमच्याकडे पण मतदार आहेत, पण आम्ही स्वार्थी नाहीत. छत्रपती संभाजीनगरला परवा एकाचं घर पाडलं. पोलिसांनी जरा गांभीर्याने घ्यावं, पोलिसांनी जर अशा पद्धतीने पक्षपात केला, न्याय दिला नाही तर मग दंगल झाली तर तुम्ही जबाबदार असाल, असा इशारा यावेळी लांडगे यांनी दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *