Headlines

4 दिवसांत 1.3 कोटी फॉलोअर्स, ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या फॉलोअर्समध्ये प्रचंड वाढ, आज करणार वर्ल्ड रेकॉर्ड?

4 दिवसांत 1.3 कोटी फॉलोअर्स, ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या फॉलोअर्समध्ये प्रचंड वाढ, आज करणार वर्ल्ड रेकॉर्ड?
4 दिवसांत 1.3 कोटी फॉलोअर्स, ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या फॉलोअर्समध्ये प्रचंड वाढ, आज करणार वर्ल्ड रेकॉर्ड?


Cockroach Janta Party : सध्या सोशल मीडियाच्या जगात एका अनोख्या इंस्टाग्राम अकाउंटची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ नावाच्या या अकाउंटने अवघ्या काही दिवसांत विक्रमी वेगाने फॉलोअर्स मिळवत इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या अकाउंटची वाढ इतकी झपाट्याने होत आहे की सोशल मीडिया तज्ज्ञांनाही याचे आश्चर्य वाटत आहे.

सामान्यपणे एखाद्या नवीन इंस्टाग्राम अकाउंटला लाखो फॉलोअर्स मिळवण्यासाठी महिने किंवा वर्षांचा कालावधी लागतो. मात्र ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने हा टप्पा काही दिवसांत पार केला आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, या अकाउंटने 5 दिवसांपेक्षाही कमी कालावधीत तब्बल 13.5 मिलियन म्हणजेच 1 कोटी 35 लाख फॉलोअर्स मिळवले आहेत.

काही तासांत लाखो फॉलोअर्स

सोशल मीडिया ट्रॅकिंग डेटानुसार, या अकाउंटची सुरुवातीची वाढ अत्यंत विस्फोटक होती. अकाउंट सुरू झाल्यानंतर पहिल्या 3 ते 4 तासांतच जवळपास 25 ते 30 लाख फॉलोअर्स जोडले गेले. म्हणजेच त्या काळात दर तासाला सरासरी 6 ते 8 लाख नवीन फॉलोअर्स वाढत होते. इंस्टाग्रामच्या इतिहासात इतक्या वेगाने वाढ होणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते.

यानंतरही या अकाउंटची लोकप्रियता कमी झाली नाही. पुढील 48 ते 72 तासांत फॉलोअर्सचा आकडा 70 ते 90 लाखांपर्यंत पोहोचला. या काळात दर तासाला 2 ते 4 लाख फॉलोअर्स वाढत असल्याचे दिसून आले. काही व्हायरल पोस्टनंतर हा वेग आणखी वाढल्याचेही पाहायला मिळाले.

अवघ्या 4 तासांत 30 लाखांची भर

आज सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत या अकाउंटचे 10.5 मिलियन फॉलोअर्स होते. मात्र दुपारी दोन वाजेपर्यंत म्हणजेच चार तासांपेक्षा कमी वेळात फॉलोअर्सची संख्या 13.5 मिलियनवर पोहोचली. म्हणजेच काही तासांतच तब्बल 30 लाख नवीन फॉलोअर्स जोडले गेले. या वाढीचा वेग पाहता रात्रीपर्यंत हा आकडा 20 मिलियन म्हणजेच 2 कोटींचा टप्पा ओलांडू शकतो अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

भाजपच्या इंस्टाग्राम अकाउंटलाही मागे टाकले

विशेष म्हणजे, या अकाउंटने लोकप्रिय राजकीय पक्षांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडल्सनाही मागे टाकल्याची चर्चा आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या फाउंडरने याबाबत एक खास पोस्टही शेअर केली असून ती मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहे. या अकाउंटच्या यशामागे त्याचा कंटेंट महत्त्वाचा घटक मानला जात आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे पोस्ट्स प्रामुख्याने तरुणांना लक्ष्य करणारे आहेत. राजकीय व्यंग, मीम संस्कृती आणि सिस्टीमवर केलेले विनोदी टोमणे यामुळे हे कंटेंट मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहेत.

आजच्या सोशल मीडिया युगात लोकांना सहज रिलेट होणारे आणि मित्रांसोबत शेअर करावेसे वाटणारे कंटेंट झपाट्याने व्हायरल होतात. त्यामुळे या अकाउंटची पोहोच काही तासांत लाखोंपासून कोट्यवधी युजर्सपर्यंत गेली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *