Headlines

52 हजारांचा पाळणा, मुलाचे कपडे खरेदी पण मुलीचा जन्म, चिमुकलीच्या आईचा छळ, बारशापूर्वी थेट अस्मिताने..

52 हजारांचा पाळणा, मुलाचे कपडे खरेदी पण मुलीचा जन्म, चिमुकलीच्या आईचा छळ, बारशापूर्वी थेट अस्मिताने..
52 हजारांचा पाळणा, मुलाचे कपडे खरेदी पण मुलीचा जन्म, चिमुकलीच्या आईचा छळ, बारशापूर्वी थेट अस्मिताने..


कोल्हापूरमधून हादरवारी घटना पुढे आली. चक्क एक महिन्याच्या मुलीच्या आईने आत्महत्या केली. आपल्या तान्हु्ल्या लेकीला वाऱ्यावर सोडत आईने जगाचा निरोप घेतला. बारशाची तयारी सुरू होती. मात्र, आईने टोकाचे पाऊल उचलले. या घटनेने खळबळ उडाली असतानाच मुलीच्या आई वडिलांनी सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले. मुलीचे बारसे होण्यापूर्वीच आईने मृत्यूला कवटाळले. मात्र, माझ्या मुलीने आत्महत्या नाही तर तिची हत्या करण्यात आली आणि तिला कशाप्रकारे त्रास सासरच्या लोकांकडून दिला जात होता, हे मुलीच्या आईवडिलांनी सांगितल्यानंतर मोठी खळबळ उडाली. कोल्हापूरच्या राजारामपुरी येथे धक्कादायक घटना घडली. अस्मिता काटकर असे गळफास घेतलेल्या महिलेचे नाव आहे. घरात मुलीच्या बारशाची गडबड सुरू होती. तब्बल 52 हजारांचा पाळणा ऑनलाईन मागवण्यात आला होता.

सर्व कार्यक्रम धुमधडाक्यात करण्यासाठी अस्मिताच्या आईवडिलांवर दबाब होता. लग्न झाल्यापासूनच अस्मिताचा छळ तिच्या सासरच्या लोकांकडून केला जात होता. अस्मिताच्या सासरच्या लोकांकडून बाळ होण्यापूर्वीच मुलाचे कपडे घेऊन ठेवण्यात आली होती. मात्र, अस्मिता हिला मुलगी झाली आणि तिथूच अजून जास्त छळाला सुरूवात झाली.

अस्मिताचे आणि आमचे शेवटचे बोलणे झाले, त्यावेळी तिने आम्हाला बारसे मोठे करा, असे म्हटले होते. त्यावेळी आम्ही तिला सांगितले अगोदरच धोड्याच्या महिन्यात खर्च झाला. रूग्णालयात खर्च झाला हे सांगितले. अस्मिताच्या वडिलांनी म्हटले की, मुलगी एक महिन्याची असताना आमची लेक कशी आत्महत्या करू शकते? माझ्या मुलीच्या गळ्यावर वेगवेगळ्या जखमा आहेत.

नवरा, सासू आणि सासरे आणि नंदेनेच तिचा जीव घेतला, असा आरोप अस्मिताच्या आईने केला. या घटनेने खळबळ उडाली. घरात बारशाची तयारी सुरू होती, तर एक महिन्याच्या लेकराच्या आईच्या डोक्यात वेगळेच सुरू होते. अस्मिताच्या लेकरासाठी तब्बल 52 हजारांचा पाळणा बारशासाठी ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात आला होता. मात्र, त्यापूर्वीच तिने आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. आज मृतदेहाचे शवविच्छेदन न्यायाधीश आणि इतर पंचांच्या उपस्थितीत केला जाईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *