Headlines

Vinayak Raut : सूनेकडून गंभीर आरोप, अटकेपूर्वीच विनायक राऊतांनी उचललं मोठं पाऊल, येत्या 23 जुलैला होणार तरी काय?

Vinayak Raut : सूनेकडून गंभीर आरोप, अटकेपूर्वीच विनायक राऊतांनी उचललं मोठं पाऊल, येत्या 23 जुलैला होणार तरी काय?
Vinayak Raut : सूनेकडून गंभीर आरोप, अटकेपूर्वीच विनायक राऊतांनी उचललं मोठं पाऊल, येत्या 23 जुलैला होणार तरी काय?


Vinayak Raut : गिरीजा राऊत यांनी ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांचा मुलगा गितेश राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. तब्बल 7 वर्ष छळ केल्याचं आरोप गिरीजा राऊत यांनी सासरच्या मंडळींवर केले आहेत. सासरे विनायक राऊत आणि पती गितेश राऊत यांच्यासह कुटुंबीयांवर सून गिरीजा राऊत यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात जादूटोणा, मानसिक छळ आणि फसवणूक बाबत गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण आता कोर्टात पोहोचलं असून, गिरीजा राऊत यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

अटकेपूर्वीच विनायक राऊतांनी उचललं मोठं पाऊल

गिरीजा राऊत यांनी गंभीर आरोप केल्यानंतर विनायक राऊत यांनी सर्व आरोप फेटाळले आहे. तर ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी ठाणे कोर्टात रविवारी अटकपूर्व जामीन अर्ज केला असून, येत्या 23 जुलैला सुनावणी होणार आहे. त्यामुळे सुनावणी दरम्यान नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पण याप्रकरणी पूरबावडी पोलीस ठाणे कसून चौकशी करणार आहेत.

भोंदू बाबा फिरोज शेख

सर्व सत्यता पडताळनार त्यानंतर पोलिस ॲक्शन घेणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. याप्रकरणी सात जणांवर तक्रार दाखल करण्यात आली असून, भोंदू बाबा फिरोज शेख याला अटक करण्यात आली आहे. कोर्टात हजर केल्यानंतर भोंदू बाबा फिरोज शेख याला दोन दिवसांच्या पोलीस कोठडी सुनावली आहे. अघोरी पूजा आणि संबंधित घडामोडींवर फिरोज शेखची पोलिसांकडून चौकशी सुरू असून फिरोज शेखची पुन्हा वैद्यकीय तपासणी होणार अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, भोंदू बाबा फिरोज शेख यांच्या विरोधात ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

सांगायचं झालं तर, रविवारी गिरीजा राऊत यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा राऊत कुटुंबावर गंभीर आरोप केले. यावेळी त्यांच्या वकिलांनी थेट विनायक राऊत यांच्या अटकेची मागणी केली. वकिलांच्या मागणीनंतर आता विनायक राऊत यांना अटक होणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

गिरीजा राऊत यांनी सासरच्या मंडळींवर केलेले आरोप… 

कताच झालेल्या एका पत्रकार परिषदेत गिरीजा राऊत म्हणाल्या, ‘मुलगा शारीरिक संबंध ठेवण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी प्लानिंग करून माझं आयुष्य बर्बाद केलं आहे… अघोरी कृत्य जसं की वेगवेगळ्या बाबांकडे घेऊन जायचे. एवढंच नाही तर, मला मारहाण देखील केल्याचे आरोप गिरीजा राऊत यांनी केले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *