Headlines

विवोची नवीनतम ऑफर 7200mAh बॅटरीसह विवो Y51 Pro 5G स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत स्पेसिफिकेशन

विवोची नवीनतम ऑफर 7200mAh बॅटरीसह विवो Y51 Pro 5G स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत स्पेसिफिकेशन
विवोची नवीनतम ऑफर 7200mAh बॅटरीसह विवो Y51 Pro 5G स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत स्पेसिफिकेशन


विवो कंपनीने त्यांचा Vivo Y51 Pro 5G स्मार्टफोन ग्राहकांसाठी लाँच केला आहे. Y सिरीजमधील हा नवीन स्मार्टफोन दोन स्टोरेज आणि दोन रंगांच्या पर्यायांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा नवीनतम फोन ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप, मीडियाटेक डायमेन्सिटी 7000 सिरीज प्रोसेसर, 7200mAh बॅटरी आणि 44W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह भारतीय बाजारात सादर केला आहे. या फोनसाठी तुम्हाला किती पैसे खर्च करावा लागेल, त्यात कोणते फीचर्स आहेत आणि या फोनची विक्री कधी सुरू होईल हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

Vivo Y51 Pro 5G ची भारतातील किंमत

या विवो फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आहे आणि त्याची किंमत 24 हजार 999 रुपये आहे. दुसरीकडे 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 27 हजार 999 रुपये आहे. तर हा स्मार्टफोन 16 मार्चआधी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 2 हजार 500 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. फोनची विक्री 11मार्चपासून फ्लिपकार्ट आणि विवोच्या अधिकृत वेबसाइटवर सुरू झाली आहे. हा फोन फेस्टिव्ह रेड आणि नोबल गोल्ड रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Vivo Y51 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स

ओएस: हा ड्युअल सिम फोन अँड्रॉइड 16 वर आधारित ओरिजिनओएस 6 वर काम करतो.

स्क्रीन: फोनमध्ये 6.75 इंचाची एलसीडी स्क्रीन आहे जी 120 हर्ट्झ पर्यंत रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. हँडसेटमध्ये कंपोझिट प्लास्टिक बॅक पॅनल आहे आणि कंपनीचा दावा आहे की फोन धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP68, IP69 रेटिंगसह येतो.

चिपसेट: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, 4nm आधारित ऑक्टा कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 7360 प्रोसेसर देण्यात आला आहे.

कॅमेरा: फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सेलचा सेकंडरी सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोन 4K पर्यंत रिझोल्यूशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो.

बॅटरी: एक पॉवरफुल 7200mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 44W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

कनेक्टिव्हिटी: हा फोन 5जी, ड्युअल-बँड वाय-फाय, 4जी एलटीई, ब्लूटूथ व्हर्जन 5.4, जीपीएस, यूएसबी टाइप-सी पोर्ट, ग्लोनास, बीडौ आणि क्यूझेडएसएसला सपोर्ट करतो. सुरक्षेसाठी फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *