Headlines

अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई, ठाकरेंच्या नगरसेवकाला… नेमकं प्रकरण काय?

अमरावतीमध्ये महावितरणच्या एका सहाय्यक लेखापालाला नगरसेवकाशी अर्वाच्य भाषेत बोलणे चांगलेच महागात पडले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक संजय गव्हाळे आणि महावितरणचे सहाय्यक लेखापाल शिवचरण भोसले यांच्यातील वादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. या ऑडिओमध्ये दोघांमध्ये जोरदार वाद झाल्याचे ऐकू येत असून, शिवचरण भोसले यांनी नगरसेवकांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेची गंभीर दखल महावितरण प्रशासनाने घेतली. विभागाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत सहाय्यक लेखापाल शिवचरण भोसले यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली. या घटनेनंतर अमरावतीच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओमुळे महावितरणच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नागरिकांकडून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. तसेच सरकारी अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी संवाद साधताना संयम ठेवावा, अशी प्रतिक्रिया देखील व्यक्त केली जात आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *