Headlines

इराणचे दिवंगत नेते अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराच्या तारखेची घोषणा, २ कोटी लोक जमण्याचा अंदाज

इराणचे दिवंगत नेते अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराच्या तारखेची घोषणा, २ कोटी लोक जमण्याचा अंदाज
इराणचे दिवंगत नेते अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराच्या तारखेची घोषणा, २ कोटी लोक जमण्याचा अंदाज


इराणवर अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी हल्ला केला आणि त्यानंतर लागलीच इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनी यांची हत्या केली. आता सवा तीन महिन्यानंतर आपल्या सुप्रीम लीडर खामेनी याच्या अंतिम संस्काराच्या तारखेची घोषणा इराणने केली आहे. हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे, ज्यावेळी संपूर्ण देशात मोहरमचे आयोजन सुरु आहे.

तेहरानचे महापौर अलीरेजा झकानी यांनी सांगितले की दिवंगत सुप्रीम लीडर अली खामेनी यांचा राजकीय अंत्यसंस्कार पुढे ढकलला आहे. खामेनी यांचा आधी ज्या तारखेला अंत्यसंस्कार होणार होता, त्यात आता बदल केलेला आहे. असे यासाठी केले आहे की मोहरमच्या दरम्यान होणारे पारंपारिक आयोजन आणि शोक सभांवर परिणाम होऊ नये.

४ ते ९ जुलैपर्यंत होणार दफनविधी सोहळा

फार्स न्यूज एजन्सीला दिलेल्या मुलाखतीत अलीरेजा यांनी सांगितले की हा अंत्य संस्कार मोहरमच्या १० दिवसानंतर करण्याचा निर्णय घेतला आहे. अंत्यसंस्काराचा कार्यक्रम ४ जुलैपासून सुरु होऊन ९ जुलै रोजी त्यांना मशहद येथे दफन केले जाणार आहे. हे पाऊल यासाठी उचलण्यात आले आहे की लोकांना इमाम हुसैनसाठी आपला वार्षिक दुखवटा संपूर्ण श्रद्धेने आणि पारंपारिक पद्धतीने करता येईल. शिया समुदायासाठी इमामचे विशेष महत्व आहे.

680 CE मध्ये कर्बला येथील युद्धातील त्यांच्या हौताम्याचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी मोहरम दरम्यान मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. याचमुळे अली खामेनी यांचा अंत्यसंस्काराचा कार्यक्रम ४ जुलै रोजी होईल आणि ९ जुलै रोजी मशहदमध्ये त्यांचा दफनविधी केला जाईल. या अंत्यसंस्काराला मोठ्या संख्येने लोक जमा होण्याची शक्यता आहे.

एका अंदाजानुसार दिवंगत सुप्रीम लीडर अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराला जगभरातील सुमारे दोन कोटी लोक सामील होऊ शकतात. यामुळे सुरक्षा, वाहतूक आणि सार्वजनिक व्यवस्थासंदर्भात मोठ्या प्रमाणावर तयारी केली जात आहे. अली खामेनी यांनी सुमारे ३७ वर्षांपर्यंत इराण इस्लामिक रिपब्लिकचे नेतृत्व केले होते.

आधी ४ मार्च ठरली होती तारीख…

बातम्यानुसार २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त कारवाईत सेंट्रल तेहरान येथील अली खामेनी यांच्या घरावर बॉम्बहल्ला करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या मृत्यूनंतर ४ मार्च रोजी त्यांच्या राजकीय अंत्यसंस्काराची योजना तयार करण्यात आली होते. मात्र, युद्धामुळे हा अंत्यसंस्काराचा कार्यक्रम पुढे ढकल्यात आला.

इराणी सरकार आणि स्थानिय प्रशासनाने अंत्यसंस्काराच्या नव्या तारखा घोषीत केल्यानंतर देशभरात मोठ्या वेगाने तयारी सुरु करण्यात आली आहे. तेहराणपासून ते मशहदपर्यंत होणाऱ्या या अंत्यसंस्कार सोहळ्यावर जगभराची नजर आहे.कारण हा कार्यक्रम इराणच्या इतिहासातील सर्वात मोठी सार्वजनिक श्रद्धांजली सभांपैकी एक मानली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *