Headlines

भारत मैदानात, थेट होर्मुज खाडीबद्दल भारताने घेतला अत्यंत मोठा निर्णय, तब्बल 7 जहाजे भारतातून…

भारत मैदानात, थेट होर्मुज खाडीबद्दल भारताने घेतला अत्यंत मोठा निर्णय, तब्बल 7 जहाजे भारतातून…
भारत मैदानात, थेट होर्मुज खाडीबद्दल भारताने घेतला अत्यंत मोठा निर्णय, तब्बल 7 जहाजे भारतातून…


इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष काही कमी होण्याचे नाव घेत नाही. गेल्या 20 दिवसांपासून युद्ध पेटले आहे. अमेरिकेसह सर्वच देशांना या युद्धाचा फटका बसत आहे. इराणकडून अमेरिका आणि इस्त्रायलला शिक्षा देण्याकरिता होर्मुज खाडी बंद करण्यात आली. अनेक देशांचे जहाजे तिथे अडकली आहेत. मालवाहू जहाजांची मोठी रांग होर्मुजमध्ये आहे. याच खाडीतून भारतामध्ये एलपीजी गॅस आणि कच्चे तेल दाखल होते. भारताचे अनेक जहाज तिथे अडकून पडली आहेत. भारतात एलपीजी गॅसची कमी असून व्यावसायिक सिलेंडरचे वितरण बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. होर्मुज खाडीत इराण भारताच्या मदतीला आला. भारताचे काही जहाज इराणकडून सोडली जात आहेत. मात्र, भारतात सध्याच्या घडीला मोठा गॅस तुटवडा आहे, ही वस्तुस्थिती आहे. यादरम्यानच भारताचे होर्मुजमध्ये अडकलेल्या दोन जहाजांना होर्मुज खाडी पार करण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

आपल्या जहाजांना होर्मुज खाडी पार करता यावी, याकरिता भारत मैदानात उतरल्याचे बघायला मिळतंय. भारताने पूर्ण फिल्डिंग लावली आहे. भारतीय नौदल अनेक ठिकाणी आपली तैनाती वाढवत आहे. दहा दिवसांपूर्वी उत्तर अरबी समुद्रातून भारतीय बंदरांपर्यंत जहाजांना संरक्षण देण्यासाठी टास्क फोर्स तयार करण्यात आला होता.

होर्मज खाडीच्या आसपास भारताने आपले सात जहाज पाठवल्याची माहिती मिळत आहे. होर्मुज खाडीतून भारतीय जहाजांना सुरक्षा देण्याकरिता भारतीय नाैदलाने हा निर्णय घेतला. आता भारतीय नौदल अरबी समुद्र आणि ओमानच्या आखातात अतिरिक्त युद्धनौका तैनात करत आहे. मुळात म्हणजे या तैनातीचा मुख्य उद्देश इतकाच आहे की, एलपीजी आणि इंधन वाहून नेणाऱ्या जहाजांना सुरक्षित वाहतूक करता येईल.

होर्मुज खाडीतून आज भारताचे दोन जहाज निघण्याची शक्यता आहे. एलपीजी गॅस या जहाजांवर आहे. या जहाजांना भारतीय नाैदल सुरक्षा देईल. भविष्यातील कोणत्याही तैनातीसाठी पर्शियन गल्फच्या जवळ राहणे देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळेही भारताकडून अशाप्रकारचे निर्णय घेतले जात आहेत. होर्मुज खाडीत स्थिती भयंकर आहे. एकही जहाज इराणकडून सोडले जात नाहीये.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *