Headlines

अनेक राजकीय नेत्यांचे फोटो…; लिंगपिसाट खरात प्रकरणावर उद्धव ठाकरेंची खळबजनक प्रतिक्रिया

अनेक राजकीय नेत्यांचे फोटो…; लिंगपिसाट खरात प्रकरणावर उद्धव ठाकरेंची खळबजनक प्रतिक्रिया
अनेक राजकीय नेत्यांचे फोटो…; लिंगपिसाट खरात प्रकरणावर उद्धव ठाकरेंची खळबजनक प्रतिक्रिया


नाशिकमधील लिंगपिसाट अशोक खरात प्रकरण सध्या चांगेलच तापले आहे. एका महिलेने अशोक खरातवर अत्याचार आणि बलात्काराचा आरोप केल्यानंतर अटक करण्यात आली. त्यानंतर अशोक खरातचे अनेक काळे कारनामे समोर आले आहेत. अशोक खरात यांचे अनेक राजकीय व्यक्तींशी चांगले संबंध होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात याबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

“तुम्ही लिंबाच्या लागवडीवर आलात”

उद्धव ठाकरे यांनी नुकताच घेतलेल्या पत्रकार परिषदेत भोंदूबाबा अशोख खरात प्रकरणावर वक्तव्य केले. ते म्हणाले, “आणखी किती खालच्या पातळीवर महाराष्ट्र नेणार आहोत. महाराष्ट्रात जादू टोणा विरोधी कायदा आहे. कायद्याचं पालन करणारेच भोंदू बाबाच्या नादी लागणार असतील तर त्यांच्या भोंदू भक्तांवर कारवाई झाली पाहिजे. राजकारणात जे दिसत आहेत. तरच महाराष्ट्राला आधुनिक म्हणू. आम्ही लॉजिस्टिकच्या माध्यमातून महाराष्ट्र पुढे नेत आहोत. पण तुम्ही लिंबाच्या लागवडीवर आलात. त्याला टाचण्या मारणं आमचं काम नाही.”

“आपल्याकडे कायदा आहे”

पुढे ते म्हणाले की, “आता या एपस्टिन फाईलवरून कुणाचं लक्षण उडू नये म्हणून राज्यात नवीन विषय सुरू होता कामा नये. आपल्याकडे कायदा आहे. त्याचं कठोरतेने पालन केलं पाहिजे. अनेक राजकीय नेत्यांचे फोटो आणि नावे येतात. याचा अर्थ तुम्हाला कळतोय ना. कर्तृत्व शून्य नेते हा मार्ग अवलंबत आहेत. भाकड आणि भोंदू नेते त्यांच्यात कर्तृत्व नाही, स्वकर्तृत्वाने काही करू शकत नाही तेच लोक अशा भोंदूबाबांच्या नादी लागलं आहे.”

शेवटी उद्धव ठाकरे यांनी, “मुख्यमंत्र्यांनी पांघरून मंत्रालय काढलं पाहिजे. सर्वांच्या पापावर पांघरून घातलं जात आहे. ते खातं त्यांच्याकडे ठेवावं. या निमित्ताने गावाोगावी भोंदू बाबा असतील त्याकडे कोणत्याही पक्षाचा कोणताही नेता जात असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. अगदी ओम फट स्वाहावरही.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *