Headlines

Devendra Fadnavis: भोंदूबाबा प्रकरणात बडे मासे जाळ्यात? मुख्यमंत्र्यांच्या त्या एका वाक्याने अनेकांच्या पोटात गोळा, काय म्हणाले फडणवीस? कुणालाही…

Devendra Fadnavis: भोंदूबाबा प्रकरणात बडे मासे जाळ्यात? मुख्यमंत्र्यांच्या त्या एका वाक्याने अनेकांच्या पोटात गोळा, काय म्हणाले फडणवीस? कुणालाही…
Devendra Fadnavis: भोंदूबाबा प्रकरणात बडे मासे जाळ्यात? मुख्यमंत्र्यांच्या त्या एका वाक्याने अनेकांच्या पोटात गोळा, काय म्हणाले फडणवीस? कुणालाही…


देवेंद्र फडणवीस, अशोक खरातImage Credit source: टीव्ही ९ मराठी

Devendra Fadnavis on Ashok Kharat: अशोक खरातचं प्रकरण गंभीर आहे. आम्हीच त्याचा भांडाफोड केला आहे. लाजेखातर सामाजिक दबावामुळे महिला एकदम पुढे येत नाही. अशा प्रकारचे व्हिक्टीम आहेत. त्यांना धीर देऊन त्यांच्या घरच्यांना धीर देऊन त्यांना समोर आणत आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तर महिलांसोबत दुर्व्यवहार करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. याप्रकरणी कुणालाही सोडलं जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं आहे. त्यामुळे अनेक बड्या धेंडांचे धाबे दणाणले आहेत. अशोक खरातला अनेकांनी मदत केल्याचा आरोप होत आहे. मुख्यमंत्र्यांचा इशारा त्यांच्यासाठी तर नाही ना? असा अंदाज वर्तवल्या जात आहे.

पुरावे आणून द्या

या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून मॉनिटरींग होत आहे. नाशिक सीपी आणि एसआयटी मिळून काम करत आहेत. कुणालाही वाचवणार नाही. कुणाकडे पुरावा असेल तर आणून द्यावा. सगळ्याच जास्त तर माझ्याकडेच पुरावे आहेत. या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नका. राजकारण करू नये. महिलांच्या डिगनिटीचा प्रश्न आहे. आपल्या तथाकथित शक्तीचा वापर करत त्याने फसवले आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

कोणीही राजकीय रंग देऊ नये

काही प्रमाणात महिला प्रतिसाद देत आहे. वरिष्ठ स्तरावर मॉनिटरिंग होत आहे. डीजींना आदेश दिले. नाशिक सीपी आणि एसआयटी मिळून काम करत आहेत. या प्रकरणात कुणालाही स्पेअर केलं जाणार नाही. याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुरावा आणून द्या. कारवाई करू. अनेक लोकं जायचे. विरोधी पक्षाचे लोक कुणाकडे जायचे याचे पुरावे देऊ शकतो. माझ्याकडे पुरावे आहे. पण ते पोलिसांचं काम आहे.

महाविकास आघाडी सरकारवर निशाणा

कॅप्टन खरात अध्यक्ष असलेल्या मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थान साठी दारणा धरणातून पाणी आरक्षित करण्यात आले होते. 39 लाख लिटर पाणी आरक्षित करण्याची मंजुरी महाविकास आघाडीने घेतला होता. 31 जुलै 2020 रोजी यासाठीचा शासन निर्णय काढण्यात आला होता. त्याचा संदर्भ देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. कोणी भेटलं अशा गोष्टींवर कारवाई करायला लागलो तर मग कसं व्हायचं. त्याला पाणी कुणी दिलं हे तुम्ही पाहिलं आसेल. तुम्हीच दाखवलं. हा महिलांच्या डिग्निटीचा प्रश्न आहे. आपल्या तथाकथित शक्तींचा वापर करून महिलांचं शोषण केलं. आम्ही आरोपीला सोडणार नाही. सरकारला जे करायचं ते करू असा सज्जड इशाराही फडणवीस यांनी दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *