Headlines

IPL 2026: आयपीएल 2026 स्पर्धेत काय आहे नवीन? 10 संघ 74 सामने आणि 10 मोठ्या बाबी

IPL 2026: आयपीएल 2026 स्पर्धेत काय आहे नवीन? 10 संघ 74 सामने आणि 10 मोठ्या बाबी
IPL 2026: आयपीएल 2026 स्पर्धेत काय आहे नवीन? 10 संघ 74 सामने आणि 10 मोठ्या बाबी


आयपीएल 2026 स्पर्धेत काय आहे नवीन? 10 संघ 74 सामने आणि 10 मोठ्या बाबी
Image Credit source: IPL Twitter

आयपीएल 2026 स्पर्धेतील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदबाद यांच्यात 28 मार्च रोजी होत आहे. हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे. या स्पर्धेत गत वर्षीप्रमाणेच 74 सामने खेळले जाणार आहेत. त्यामुळे त्यात बदल झालेला नाही. अंतिम सामना 31 मे 2026 रोजी खेळला जाईल. या स्पर्धेत प्रत्येक फ्रेंचायझी 14 सामने खेळणार आहे. टॉप 4 मध्ये असलेले संघ प्लेऑफच्या सामन्यात खेळतील. त्यामुळे पुढचे काही दिवस टॉप 4 मध्ये राहण्यासाठी चुरस असणार आहे. पण असं असताना यंदाचं आयपीएल पर्व खास असणार आहे. कारण नियम आणि काही नव्या गोष्टींमुळे ही स्पर्धा चर्चेत राहणार आहे. चला जाणून घेऊयात 10 नियमांबाबत…

नवं मैदान आणि होम ग्राउंड

आयपीएल स्पर्धेत काही फ्रेंचायझी संघ दोन होम ग्राउंडचा वापर करणार आहेत. आरसीबी आपले दोन सामने रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह स्टेडियममध्ये खेळणार आहे. तर पंजाब किंग्स चार सामने चंदीगड आणि तीन धर्मशाळेत खेळणार आहे. राजस्थान रॉयल्स चार सामने जयपूर आणि चार सामने गुवाहाटीत खेळणार आहे.

मॅच टायमिंग आणि फॉर्मेट

दहा संघांना 5-5 अशा दोन गटात विभागलं गेलं आहे. ग्रुप अ मध्ये चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स आहे. तर ग्रुप ब मध्ये मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद, गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स आहे. या प्रत्येक संघ आपल्या गटातील संघाशी एकदा आणि दुसऱ्या गटातील संघाशी दोनदा खेळणार आहे. सामना संध्याकाळी 7.30 वाजता आणि दुपारी 3.30 वाजता सुरू होईल.

ट्रेड आणि लिलावानंतर संघ बदलले

मिनी लिलाव प्रक्रिया पार पडण्यापूर्वी काही ट्रेड झाले. यात राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील ट्रेड चर्चेत राहिला. रवींद्र जडेजा आणि सॅम करनच्या बदल्यात चेन्नई सुपर किंग्सने संजू सॅमसनला घेतलं. सॅम करन ग्रोइन इंजरीमुळे स्पर्धेतून बाद झाला आहे. लखनौ सुपर जायंट्सने मोहम्मद शमीला हैदराबादकडून , दिल्ली कॅपिटल्सने नितीश राणाला राजस्थानकडून, मुंबई इंडियन्सने मयंक मार्केंडला कोलकात्याकडून, लखनौो अर्जुन तेंडुलकरला मुंबईकडून घेतलं.

मिनी लिलावातील खास गोष्ट

मिनी लिलावात कॅमरून ग्रीनला सर्वाधिक रक्कम मिळाली. कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्यासाठी 25.2 कोटी मोजले. मथिशा पथिरानासाठी 18 कोटी दिले. आरसीबीने वेंकटेश अय्यरला 7 कोटीत घेतलं. मेगा लिलावात केकेआरने त्याच्यासाठी 23.75 कोटी मोजले होते. फिरकीपटू प्रशांत वीरसाठी आणि विकेटकीपर फलंदाज कार्तिक शर्मासाठी चेन्नई सुपर किंग्सने 14.2 कोटी मोजले. दिल्ली कॅपिटल्सने आकिब नबीला 8.4 कोटी देऊन घेतलं.

खेळाडूंना दुखापतीचं ग्रहण

दुखापतीमुळे केकेआरचा हर्षित राणा आणि आकाश दीप स्पर्धेला मुकले आहेत. पथिराणा एप्रिलमध्ये रूजू होणार असल्याची माहिती आहे. हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स अंजूनही फिट नाही त्यामुळे इशान किशन कर्णधारपद भूषवणार आहे. आरसीबीचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड सुरूवातीच्या सामन्यात खेळणार नाही. लॉकी फर्ग्युसनही पंजाब किंग्ससाठी पहिल्या काही सामन्यात खेळणार नाही. इंग्लंडच्या बेन डकेटने माघार घेतली असून त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे.

मोठी खेळाडू स्पर्धेतून आऊट

ग्लेन मॅक्सवेल, फाफ डू प्लेसिस आणि मोइन अली यांनी यावेळी मिनी लिलावात भाग घेतला नाही. हे खेळाडू पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत खेळणार आहे. आंद्र रसेलने आयपीएल स्पर्धेतून निवृत्ती घेतली असून केकेआरचा फलंदाजांना मार्गदर्शन करणार आहे.

सपोर्ट स्टाफमध्ये बदल

आपपीएल 2026 स्पर्धेपूर्वी काही संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये बदल करण्यात आला आहे. कुमार संगकारा राजस्थान रॉयल्स संघाचा हेड कोच आणि क्रिकेट डायरेक्टर झाला आहे. केकेआरने अभिषेक शर्माला हेड कोच केलं आहे. तर शेन वॉटसन असिस्टंट कोच आणि टिम साउथी गोलंदाज प्रशिक्षक होणार आहे.

एमएस धोनीचं शेवटचं पर्व

आपीएल स्पर्धेच्या पहिल्या पर्वापासून महेंद्रसिंह धोनी खेळत आहे. आता चेन्नई सुपर किंग्सचने त्याची जागा भरून काढण्यासाठी संजू सॅमसनला घेतलं आहे. त्यात दुखापतीमुळे धोनी पहिल्या दोन तीन सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत धोनीचं हे शेवटचं पर्व ठरू शकते.

बीसीसीआयचे नवे नियम

  • सामन्याच्या दिवशी कोणत्या संघाला प्रॅक्टिस किंवा ट्रेनिंग करता येणार नाही.
  • संघांना दोन पेक्षा जास्त सराव सामने खेळण्याची परवानगी नाही
  • सरावासाठी नेट शेअर केली जाणार नाही. प्रत्येक संघाला सरावासाठी नवी नेट्स मिळणार.
  • होम टीमला सामन्यापूर्वी म्हणजेच चार दिवस आधी सामन्याच्या खेळपट्टीवर सराव किंवा ट्रेनिंग करता येणार नाही.
  • कुटुंबिय आणि मित्रांना खेळाडूंसोबत प्रवास करता येणार नाही.
  • बीसीसीआयने आपीएल 2026 दरम्यान खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला मैदानाजवळी एलईबी बोर्डजवळ बसण्यास बंदी घातली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *