Headlines

लिंबू, हळद-कुंकू, काळी बाहुली… जावयाकडून सासऱ्याच्या घरासमोर जादूटोणा, अहिल्यानगर हादरलं

लिंबू, हळद-कुंकू, काळी बाहुली… जावयाकडून सासऱ्याच्या घरासमोर जादूटोणा, अहिल्यानगर हादरलं
लिंबू, हळद-कुंकू, काळी बाहुली… जावयाकडून सासऱ्याच्या घरासमोर जादूटोणा, अहिल्यानगर हादरलं


संपूर्ण राज्यात सध्या भोंदू बाबा अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांची चर्चा आहे. खरातने भोंदू गिरी आणि धार्मिक विधीच्या नावाखाली अनेक महिलांवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर विविध कलमांखाली गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. 21 व्या शतकाकडे जग वाटचाल करत असताना लोकांचा अजूनही अंधश्रद्धेवर विश्वास असल्याचे समोर येत आहे. अशातच आता अहिल्यानगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जावयाकडून सासऱ्याच्या घरासमोर जादूटोणा करण्यात आल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सासऱ्याच्या घरासमोर जादुटोण्याचा प्रकार

अहिल्यानगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे जावयाने सासऱ्याच्या घरासमोर मध्यरात्री जादूटोणा करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गोविंद गंगाधर पठारे (वय 53) यांनी आरोपी असलेला जावई विशाल रावसाहेब लांडगे (रा. देहरे) याला घटनास्थळी पकडले असून त्याचे तीन साथीदार फरार झाले आहेत. घटनास्थळी टाचण्या टोचलेले लिंबू, काळी बाहुली, हळद-कुंकू तसेच आरोपीच्या बुलेटजवळ कुऱ्हाड, दोरी आणि इतर साहित्य आढळून आले असून या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

नेमक काय आहे प्रकरण ?

गोविंद आणि मनीषा पठाडे यांची मुलगी पूनम हिचा विशाल बरोबर 2020 मध्ये विवाह झाला होता. मात्र त्यानंतर पाच वर्षांनीच म्हणजेच 2025 मध्ये पूनमचा घातपाती मृत्यू झाला. याप्रकरणी आई-वडील वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिचा पती विशाल सह सासू-सासर्‍यांना देखील जेलची हवा खावी लागली होती. त्यानंतर या कुटुंबाला जामीन देखील मिळाला होता. सध्या जावई विशाल आणि मयत पूनम यांचा तीन वर्षाचा मुलगा आजी आजोबांकडे आहे. हा मुलगा मिळवण्यासाठी असा काही प्रकार केला का हे आता तपासले जाणार आहे.

या प्रकाराबाबत बोलताना मनीषा पठाडे यांनी सांगितले की, ‘आम्ही रात्री झोपल्यानंतर मुलीचे मिस्टर येथे आले, त्यांनी आमच्या दरवाजासमोर जादुटोणा केला. आवाज झाल्यामुळे आम्ही जागे झालो, त्यामुळे तो पळून गेला. मात्र आम्ही त्याला पकडले. तो आम्हाला मारण्यासाठी आला होता. त्याने आमची मुलगी मारलेली आहे, त्याने आम्हाला धमक्याही दिलेल्या आहेत. तो कदाचित बाळ नेण्यासाठी आला असेल.’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *