Headlines

दोन फेऱ्या जिद्दीने पूर्ण केल्या, तिसरीला शरीर थकलं अन् अचानक… पुण्यात पोलीस भरतीवेळी नेमकं काय घडलं?

दोन फेऱ्या जिद्दीने पूर्ण केल्या, तिसरीला शरीर थकलं अन् अचानक… पुण्यात पोलीस भरतीवेळी नेमकं काय घडलं?
दोन फेऱ्या जिद्दीने पूर्ण केल्या, तिसरीला शरीर थकलं अन् अचानक… पुण्यात पोलीस भरतीवेळी नेमकं काय घडलं?


पोलिसांची वर्दी परिधान करुन आपल्या कुटुंबाची गरिबी दूर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुरुषोत्तम भीमराव बुरकुल (२३) असे या मृत तरुणाचे नाव आहे. पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस कवायत मैदानावर ही ही हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

पुण्यात पोलीस भरतीसाठी २८ मार्चला शारीरिक चाचणी प्रक्रिया सुरू होती. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील चिंचोली बुरकुल येथून पुरुषोत्तम या चाचणीसाठी पुण्यात आला होता. भरती प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाच्या अशा १६०० मीटर धावण्याच्या शर्यतीत तो सहभागी झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तमने पहिल्या दोन फेऱ्या पूर्ण उत्साहाने आणि जिद्दीने पार केल्या होत्या. मात्र, तिसरी फेरी धावत असताना अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले. धावता धावता त्याला तीव्र झटका आला. तो जागीच ट्रॅकवर कोसळला. मैदानावरील उपस्थित पोलीस अधिकारी आणि वैद्यकीय पथकाने त्याला तत्काळ प्रथमोपचार देऊन ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती.

कुटुंबाचा एकुलता एक आधार हरपला

पुरुषोत्तमची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्याचे वडील गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाघाताने (Paralysis) आजारी आहे. ते अंथरुणाला खिळलेले आहेत. घरात आई आणि दोन बहिणींच्या विवाहाची तसेच संपूर्ण उदरनिर्वाहाची जबाबदारी पुरुषोत्तमच्या खांद्यावर होती. सरकारी नोकरी मिळवून वडिलांचे उपचार आणि घराला आधार देण्याचे त्याचे स्वप्न होते. तो एक शांत, संयमी आणि कष्टाळू तरुण म्हणून गावात परिचित होता.

गावावर शोककळा

पुरुषोत्तमच्या निधनाची बातमी चिंचोली बुरकुल गावात समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. एका होतकरू तरुणाचा असा अचानक अंत झाल्याने ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याने पोलीस भरतीसाठी अत्यंत मेहनत घेतली होती. मात्री नशिबाने त्याला साथ दिली नाही, अशा भावना व्यक्त होत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *