Headlines

kharghar | धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं… पांडवकडा धबधब्यावर मोठी दुर्घटना

kharghar | धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं… पांडवकडा धबधब्यावर मोठी दुर्घटना
kharghar | धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं… पांडवकडा धबधब्यावर मोठी दुर्घटना


राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या धो-धो पावसामुळे अनेक ठिकाणचे धबधबे प्रवाहित झाले आहेत. पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने धबधब्यांच्या ठिकाणी गर्दी करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.

खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर मोठी दुर्घटना घडली असून दोन मुले पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. तब्बल 24 तास उलटून गेले तरी मुलांचा शोध लागलेला नाही.

दरम्यान, हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांना आवश्यकता नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाने धबधबे, नद्या आणि समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरीही अनेक पर्यटक जीव धोक्यात घालून धबधब्यांजवळ जात असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *