Headlines

अमेरिका इराण युद्ध संपून होर्मुज खाडी खुली होणार? मास्टर प्लॅन तयार, अगदी काही वेळातच..

अमेरिका इराण युद्ध संपून होर्मुज खाडी खुली होणार? मास्टर प्लॅन तयार, अगदी काही वेळातच..
अमेरिका इराण युद्ध संपून होर्मुज खाडी खुली होणार? मास्टर प्लॅन तयार, अगदी काही वेळातच..


इराण आणि अमेरिका युद्ध भडकले आहे. मोठे हल्ले केले जात आहेत. यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांनी 48 तासाचा वेळ शांतता करार करण्याकरिता इराणला दिला. होर्मुज खाडी खुली करा नाही तर नरकात जा असे थेटपणे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटल्याने खळबळ उडाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता करार हवे आहेत, जर तसे झाले नाही तर इराणचा विनाश होईल असे त्यांनी म्हटले. इराणच्या पायाभूत सुविधा, ऊर्जा प्रकल्प, तेल रिफायनरी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली. शिवाय त्यांनी म्हटले की, इराणला पुन्हा एकदा उभा राहण्याकरिता 20 वर्षांचा कालावधी लागेल. होर्मुज खाडी बंद असल्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दबाव आहे. थेटपणे अनेक देशांना या युद्धाचा वाईट परिणाम भोगावा लागत आहे. अमेरिकेने हल्ला केल्यानंतर मोठी कारवाई करत इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढत आहेत.

तेलाची निर्यात आणि आयात ठप्प झाल्याचेही बघायला मिळत आहे. दुसरीकडे मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. होर्मुज खाडी खुली होण्याची शक्यता आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, मध्यस्थी करत असलेल्या देशांनी इराण आणि अमेरिकेला टू स्टेप पीस प्लॅन दिला आहे. रिपोर्टनुसार, हा सर्व प्लॅन पाकिस्तानने तयार केला आहे. मुळात म्हणजे इराणकडून पाकिस्तानच्या मध्यस्थीला स्वीकार केले गेले नाहीये. यामुळे यात किती यश मिळेल, हे लवकरच स्पष्ट होईल.

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानने तेहरान आणि अमेरिका दोघांसाठीही शांतता करार तयार केला आहे. आजच इराणकडून स्पष्ट करण्यात आले की, युद्धात पाकिस्तानची कोणतीही भूमिका नाहीये. इराणने हा देखील दावा खोडून काढला की, त्यांचे अमेरिकेसोबत काही बोलणे झाले. 45 दिवसात युद्धबंदी जाहीर होऊ शकते, असे सांगितले जात आहे.

यापूर्वीही अमेरिकेकडून इराणला शांतता प्रस्ताव देण्यात आला. त्या प्रस्तावाला इराणकडून केराची टोपली दाखवण्यात आली. पाकिस्तान युद्धबंदी करारात लुडबुड करत असल्याचे बघायला मिळत आहे. मात्र, पाकिस्तानची यात भूमिका अगोदर इराणला खटकत आहे. इजिप्तकडून मध्यस्थी करण्यास इराण तयार आहे. काही तासात युद्धाबाबत मोठ्या घडामोठी पुढे येऊ शकतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *