Headlines

दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार का? शरद पवारांकडून एक घाव दोन तुकडे, संस्पेन्स संपला

दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार का? शरद पवारांकडून एक घाव दोन तुकडे, संस्पेन्स संपला
दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार का? शरद पवारांकडून एक घाव दोन तुकडे, संस्पेन्स संपला


अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरून अनेकदा आरोप-प्रत्यारोप झाल्याचं देखील पहायला मिळालं. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात बोलणी सुरू होती, असा दावा देखील  अजितदादा यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. त्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर प्रतिक्रिया देताना त्यांनी मोठं विधान केलं आहे. आमच्याकडून विलिनीकरणाची चर्चा जयंत पाटील आणि अजित पवार हे करत होते. अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाल्यावर ही चर्चा थांबली, प्रक्रिया थांबली. आता त्या विषयाची आमच्या पक्षात चर्चा झाली नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले शरद पवार?

आमच्याकडून विलिनीकरणाची चर्चा जयंत पाटील आणि अजित पवार हे करत होते. अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाल्यावर ही चर्चा थांबली. आता त्या विषयाची आमच्या पक्षात चर्चा झाली नाही. अजितदादांसोबत या संदर्भात पाच- सहा बैठका झाल्या. बैठक झाल्यावर दोघांपैकी एक येऊन मला ब्रिफिंग करायचे. भविष्यात ही प्रक्रिया पुढे होऊ शकते की नाही आज ते सांगता येत नाही. अजित पवारांचा दृष्टिकोण आणि आग्रह हा आमच्या लोकांना समाधान देणारा होता. ते गेल्यामुळे ते कंटिन्यू राहिलं नाही. त्यामुळे आता पक्षाचं काम करत राहावं अशीच भूमिका आहे. माझ्या आजारपणामुळे कामात खंड पडला. आता आणखी काही दिवसांनी मी लोकांमध्ये जाणार आहे, असं यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने आपला उमेदवार दिला आहे, यावर देखील शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. समोर कुणीतरी लढेल हे मान्य करूनच निवडणुकीत उभं राहावं लागतं. एखाद्या मतदारसंघात राजकीय पक्षाने भूमिका घेतली तर हा राजकीय विषय नाही. राज्याचा विषय नाही,  असंही यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटानं देखील सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *