Headlines

Sushma Andhare | अशोक खरात प्रकरण तापलं; सुषमा अंधारेंची CID चौकशीची मागणी, तपास वेगाने झाला नाही तर आंदोलनाचा इशारा

Sushma Andhare | अशोक खरात प्रकरण तापलं; सुषमा अंधारेंची CID चौकशीची मागणी, तपास वेगाने झाला नाही तर आंदोलनाचा इशारा
Sushma Andhare | अशोक खरात प्रकरण तापलं; सुषमा अंधारेंची CID चौकशीची मागणी, तपास वेगाने झाला नाही तर आंदोलनाचा इशारा


अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा दावा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अशोक खरात यांच्यात 17 फोन कॉल्स झाल्याचे म्हटले होते. मात्र, या दाव्यानंतर दमानिया यांच्याकडे अशोक खरात यांचा कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) नेमका कसा आला, असा सवाल विविध स्तरांवरून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली. त्यांनी या प्रकरणातील तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, एसआयटीच्या तपासाला वेग येत नसेल तर प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे सोपवावी, अशी मागणी केली. अंधारे यांनी पुढे विचारले की, “आर्थिक स्रोतांचा तपास का होत नाही? जर एखादा बाहेरचा व्यक्ती CDR मिळवू शकतो, तर एसआयटीला ते का शक्य होत नाही?” तसेच, या प्रकरणात तातडीने आणि वेगवान कारवाई करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. “जर तपासात गती आली नाही, तर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल. हा लेकीबाळींचा प्रश्न आहे,” असा इशाराही सुषमा अंधारे यांनी दिला. या सर्व घडामोडींमुळे अशोक खरात प्रकरणातील तपास आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *