
हिंगोलीमध्ये अवकाळी पावसामुळे स्थानिक शेतकर्यांना मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात यंदा दहा-बारा दिवसांमध्येच तीन ते चार वेळा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे हाताशी आलेलं पिकं उद्ध्वस्त झाले.
महाराष्ट्रातील विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर नव्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. यावेळी शेत मालकांनी लाखो रुपये खर्च करुन कोबी पिक लावलं होतं मात्र सलग तीन दिवस झालेल्या पाऊस आणि गारपिठीमुळे सगळंच्यासगळं पिक उद्ध्वस्त झालं. शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना यंदा जास्त उत्पादन होण्यार अशी अपेक्षा होती मात्र अवकाळीमुळे काहीच पीकदेखील उरलेलं नाही. बळीराजकडे आता नष्ट झालेलं पिक कापणीचेही पैसे नाहीत. शेतकऱ्यांवर अगदी कर्जबाजारी होण्याची पाळी आली आहे.
दरम्यान, झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.