Headlines

मान्सूनच्या नव्या अंदाजाने खळबळ! यंदा दुष्काळाने परिस्थिती महाभयंकर? 40 कोटी लोकांवर मोठं संकट!

मान्सूनच्या नव्या अंदाजाने खळबळ! यंदा दुष्काळाने परिस्थिती महाभयंकर? 40 कोटी लोकांवर मोठं संकट!
मान्सूनच्या नव्या अंदाजाने खळबळ! यंदा दुष्काळाने परिस्थिती महाभयंकर? 40 कोटी लोकांवर मोठं संकट!


भारतात अवघ्या दोन महिन्यांमध्ये पावसाळा सुरू होणार आहे. साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये मान्सूनचे आगमन होते. यानंतर मान्सून संपूर्ण भारतात पोहोचतो, मात्र यंदा मान्सूनच्या नव्या अंदाजामुळे खळबळ उडाली आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे देशातील 40 कोटी लोकांवर मोठे संकट ओढवण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मान्सूनबाबतच्या नव्या अंदाजाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

यंदा कमी पाऊस पडण्याची शक्यता

भारतात मान्सून दाखल होण्यापूर्वीच एप्रिलच्या सुरुवातीला महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात गारवा टिकून आहे, मात्र प्रत्यक्ष मान्सूनच्या काळात पावसाची कमतरता जाणवू शकते. खासगी हवामान अंदाज संस्था स्कायमेट वेदरने 2026 च्या मान्सूनबाबत गंभीर इशारा दिला आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार या वर्षी देशातील एकूण सरासरीच्या सुमारे 94% पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा आकडा 5 टक्के कमी किंवा जास्त असू शकतो. याचाच अर्थ जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी 868.6 मिमी पावसाच्या तुलनेत सुमारे 816 मिमी पाऊस पडू शकतो. यामुळे देशातील अनेक भागांत दुष्काळ पडू शकतो, ज्यामुळे कृषी अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो.

एल-नीनो चिंता वाढवणार

भारतात कमी पाऊस पडण्याचे प्रमुख कारण म्हणजे एल नीनो प्रवाह हे आहे. दीड वर्ष ला निनोचा प्रभाव राहिल्यानंतर आता प्रशांत महासागर ENSO-न्यूट्रल स्थितीकडे जात आहे, पण लवकरच एल-नीनो सक्रिय होण्याची शक्यता आहे. स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतीन सिंग यांनी सांगितले की, ‘एल-नीनो मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात दिसून येईल आणि पुढे अधिक तीव्र होईल, ज्यामुळे मान्सून कमकुवत होऊ शकतो. विशेषतः हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात पाऊस अनियमित राहील.’ त्यामुळे सुरुवातीला कमी पाऊस झाल्यास दुष्काळाची परिस्थिती तयार होऊ शकतो.

देशाच्या या भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता

समोर आलेल्या माहितीनुसार, जूनमध्ये सरासरीच्या 101% पाऊस पडण्याची शक्यता आहे, पण जुलै (95%), ऑगस्ट (92%) आणि सप्टेंबर (89%) मध्ये तो घटत जाण्याचा अंदाज आहे. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या पूर्वेकडील राज्यांत तुलनेने चांगला पाऊस पडू शकतो, तर उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात पावसाची कमतरता राहू शकते. याचा थेट परिणाम भातासह इतर मान्सून पिकांवर होईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *