Headlines

तुम्हाला काही बोलायचं का? न्यायाधीशांसमोर भोंदू बाबा अशोक खरातने… कोर्टात काय घडलं?

तुम्हाला काही बोलायचं का? न्यायाधीशांसमोर भोंदू बाबा अशोक खरातने… कोर्टात काय घडलं?
तुम्हाला काही बोलायचं का? न्यायाधीशांसमोर भोंदू बाबा अशोक खरातने… कोर्टात काय घडलं?


अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या तथाकथित भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत वाढ झाली आहे. नाशिक सत्र न्यायालयाने तिसऱ्या गुन्ह्यात खरातला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नाशिक येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात आज हाय-प्रोफाईल सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने खरातच्या कृत्यांचा धक्कादायक पाढा वाचला. तसेच त्याच्या विरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाचे गंभीर पुरावे सादर केले.

कोर्टात काय घडले?

आज नाशिक सत्र न्यायालयात न्यायमूर्ती बी. एन. इचपुराणिक यांच्यासमोर अशोक खरात प्रकरणाची सुनावणी पार पडली. आरोपी अशोक खरात हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (VC) द्वारे न्यायालयात हजर झाला होता. यावेळी तो हात जोडून उभा राहिला. त्यानतंर त्याने नाव सांगितले. या सुनावणीला सुरुवात होताच तपास अधिकाऱ्यांनी लॅपटॉप आणि महत्त्वाचे तांत्रिक पुरावे सादर केले. यानतंर सरकारी वकिलांनी युक्तिवाद सुरु केला.

अशोक खरातने एका ७ महिन्यांच्या गरोदर महिलेवर अत्यंत अमानवीय पद्धतीने अत्याचार केले. सातव्या महिन्यात नजर लागते असे सांगून विशिष्ट विधी करण्याच्या बहाण्याने त्याने पीडित महिलेला गुंगीचे औषध दिले. यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. इतकेच नव्हे तर हे कृत्य करताना त्याने लॅपटॉपसमोर ठेवून त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला, असा दाट संशय पोलिसांना आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. आरोपी हुशार आणि चाणाक्ष आहे. तो आम्हाला तपासात सहकार्य करत नाही, असे सरकारी वकील म्हणाले.

पोलिसांची मागणी काय?

त्यासोबत या सुनावणीदरम्यान पोलिसांनी न्यायालयात माहिती दिली. अशोक खरात हा केवळ लैंगिक अत्याचारच करत नव्हता, तर त्याने फसवणुकीचा मोठा जाळे विणले होते. बाजारातील साधे चिंचोके पॉलिश करून ते मौल्यवान असल्याचे भासवून खरातने भाविकांना लाखो रुपयांना विकले. विधी करताना लोकांना घाबरवण्यासाठी तो नकली साप, नाग आणि वाघाच्या कातड्याचा वापर करत असे. या सर्व कृत्यांमध्ये त्याला कोण मदत करत होते आणि बनावट खडे तो कोणाकडून घेत होता, याचा तपास करण्यासाठी आम्हाला ७ दिवसांची पोलीस कोठडी हवी आहे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

तर दुसरीकडे, अशोक खरातच्या वकिलांनी असा दावा केला की, आरोपीने गुन्हा कबूल केला आहे. पण त्यामागाचा उद्देश शोधायचा, म्हणजे नेमकं काय, यापूर्वी देखील पोलीस कोठडीतच आरोपी होता. नोव्हेंबर २०२३ ते डिसेंबर २०२५ या काळातील ही घटना आहे. हा जो तक्रारदार आहे, त्याच्या विरोधात खंडणी मागितल्याचा आरोप होता. या तक्रारदाराची तक्रारच संशयास्पद आहे. 21 मार्च 2026 रोजी हा गुन्हा नोंदवला गेला. पोलीस कोठडीत या सगळ्या घटनांचा तपास झाला आहे, असे आरोपीच्या वकिलांनी म्हटले.

अशोक खरातने कोर्टात काय केलं?

मात्र, न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य आणि आरोपीचे असहकार्य लक्षात घेता अशोक खरातला पोलीस कोठडीत पाठवण्याचा निर्णय घेतला. यानंतर न्यायालयाने अशोक खरातला स्वतःची बाजू मांडण्याची संधी दिली. यावेळी कोर्टाने त्याला तुम्हाला काही सांगायचे आहे का? असे विचारले. त्यावर त्याने नाही म्हणत हात जोडले. दरम्यान आता अशोक खरात हा पुढील 5 पोलिस कोठडीत राहणार आहे. त्यामुळे अजून अनेक प्रकरणाशी संबंधित खुलासे होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *