Headlines

युद्धविरामानंतर इराणचा सर्वात मोठा धक्का; भारत मोठ्या संकटात, मित्र असूनही शत्रूसारखा वागला

युद्धविरामानंतर इराणचा सर्वात मोठा धक्का; भारत मोठ्या संकटात, मित्र असूनही शत्रूसारखा वागला
युद्धविरामानंतर इराणचा सर्वात मोठा धक्का; भारत मोठ्या संकटात, मित्र असूनही शत्रूसारखा वागला


इराण, अमेरिका आणि इस्त्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला होता. अखेर इराण आणि अमेरिकेमध्ये युद्धविरामाची घोषणा झाली आहे. बुधवारी युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूज वाहतुकीसाठी बंद केला होता. त्यामुळे जगातील अनेक देशांवर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं होतं. याचा मोठा फटका हा भारताला देखील बसला. कारण भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार देश आहे. भारताचे अनेक जहाज हे या मार्गावर अडकून पडले होते. दरम्यान आता अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला आहे, त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येईल, ऊर्जा संकट दूर होईल असं वाटत असतानाच. इराणे जगाला आणखी एक मोठा झटका दिला आहे.

युद्ध सुरू होण्यापूर्वी म्हणजे 28 फेब्रुवारी पूर्वी स्ट्रीट ऑफ होर्मूजवर इराणकडून कोणतेही प्रतिबंध लावण्यात आले नव्हते. मात्र त्यानंतर युद्ध सुरू झाल्यानंतर इराणकडून स्ट्रीट ऑफ होर्मूजवर अनेक प्रतिबंध घालण्यात आले. आता मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे जरी युद्धविरामाची घोषणा झाली असली तरी देखील इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूजच्या सामुद्रधुनीवर घातलेले प्रतिबंध कायम ठेवले आहेत. सध्या एका दिवसामध्ये फक्त 15 च कच्च्या तेलाचे जहाजन या मार्गाने जातील असं इराण म्हटलं आहे.

रशियन वृत्तसंस्था असलेल्या तास च्या एका रिपिर्टनुसार आता युद्धविराम झाल्यानंतर देखील इराणने होर्मूजच्या सामुद्रधुनीवरील प्रतिबंध हटवण्यास नकार दिला आहे. एका दिवसात या मार्गाने फक्त 15 च जहाजन जातील असं इराणने म्हटलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार इराणला स्ट्रीट ऑफ होर्मूजवरील आपली पकड ढिल्ली होऊ द्यायची नाहीये, त्यामुळे इराणकडून आता हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतालाही फटका

दरम्यान युद्धविराम झाल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येईल, ऊर्जा संकट दूर होईल असं वाटत असतानाच आता इराणने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जोपर्यंत इराण ही बंदी पूर्णपणे उठवत नाही, तोपर्यंत ऊर्जा संकट कायम राहण्याची शक्यता आहे. एका दिवशी केवळ 15 जहाजांनाच जाण्याची परवानगी देण्यात आल्यामुळे या मार्गाने सध्यातरी पूर्वी इतका पुरवठा होण्याची शक्यता कमी आहे. याचा फटका हा भारताला देखील आता बसू शकतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *