Headlines

युद्ध थांबताच इराणची मोठी खेळी, पाकिस्तान पाहतच राहिला, चीनला जबर शॉक, भारताला…

युद्ध थांबताच इराणची मोठी खेळी, पाकिस्तान पाहतच राहिला, चीनला जबर शॉक, भारताला…
युद्ध थांबताच इराणची मोठी खेळी, पाकिस्तान पाहतच राहिला, चीनला जबर शॉक, भारताला…


पश्चिम आशियातील सध्याचा तणाव आणि राजनैतिक गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, अनिश्चततेचं वातावरण आहे. मात्र असं असतानाच इराणला भारतसोबत असलेल्या मैत्रीचा विसर पडलेला नसून, इराणने भारतासोबतच्या आपल्या संबंधांवर पुन्हा एकदा जोरदार भर दिला आहे. भारतातील इराणी दूतावासाने चाबहार बंदराचे फोटो शेअर करत, त्याला इराण-भारत मैत्रीचा ‘सुवर्ण सेतू’ म्हटलंय. तेहरान आणि वॉशिंग्टन यांच्यातील (अमेरिका-इराण) युद्धविरामानंतर चर्चा सुरू असतानाच हा संदेश आला आहे. ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये इराणच्या दूतावासाने चाबहार बंदराचे महत्त्व पुन्हा अधोरेखित केलं. हे बंदर दोन्ही देशांमधील सहकार्य आणि विश्वासाचे प्रतीक आहे, विशेषतः अशा वेळी जेव्हा प्रादेशिक तणावामुळे राजनैतिक घडामोडींवर परिणाम होतोय, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिका आणि इस्रायलने चाबहार बंदर शहरावर हवाई हल्ला केला होता, मात्र त्यात या बंदराचं काही नुकसान झालं नाही.

चाबहारमध्ये भारताची उपस्थिती ही चीन आणि पाकिस्तानच्या डोळ्यांत नेहमीच खुपत असते. भारताला कमकुवत करण्यासाठी पाकिस्तानने तिथे आगळीक करत अनेक षडयंत्रे रचली होती, पण ते अयशस्वी ठरले. तर तीन हा ‘बेल्ट अँड रोड कॉरिडॉर’ प्रकल्पाच्या माध्यमातून तिथे आपलं बस्तान बसवण्याचा प्रयत्न करत असून, यामुळे भारत या प्रदेशात बीजिंगसाठी एक प्रमुख प्रतिस्पर्धी बनला आहे. साहजिकच, चीनला हे अजिबात आवडलेलं नाहीये. अमेरिका आणि इराण यांच्यातील अनेक आठवड्यांच्या संघर्षानंतर अलीकडेच दोन आठवड्यांसाठी तात्पुरती शस्त्रबंदी लागू करण्यात आली होती. या युद्धविरामात पाकिस्तानची महत्वाची भूमिका असल्याचे बोलले जात आहे. तणाव कमी करणे, सागरी मार्ग पुन्हा सुरू करणे आणि व्यापक वाटाघाटींचा मार्ग मोकळा करणे हे दोन्ही देशांमधील कराराचे उद्दिष्ट आहे.

मात्र असं असलं तरीही शस्त्रसंधीचा हा करार अजूनही नाजूक स्थितीत आहे. लेबनॉनशी संबंधित संघर्ष आणि सागरी मार्गावरील वाद या कराराला सतत आव्हान देत आहेत. इस्रायलने लेबनॉनवर चढवलेले हल्ले आणि युद्धविरामाबद्दल वेगवेगळ्या भूमिकांमुळे राजनैतिक प्रयत्न गुंतागुंतीचे झाले आहेत. तसेच व्यापक प्रादेशिक संघर्षाचा धोका वाढला आहे. अशा या संवेदनशील वेळी चाबहार बंदराला प्राधान्य देऊन, इराणने भारतासोबतचे आपले मजबूत आर्थिक आणि सामरिक संबंध स्पष्टपणे दर्शवले आहेत.

युद्धानंतरही मैत्री अतूट

खरंतर चाबहार बंदर हे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, कारण त्यामुळेच पाकिस्तानला टाळून अफगाणिस्तान आणि मध्य आशियामध्ये प्रवेश मिळतो. हा द्विपक्षीय संबंधांचा आधारस्तंभ असल्याचे दोन्ही देशांचे बऱ्याच काळापासून मानणे आहे. संघर्षाच्या काळातही इराणने भारतासोबत सकारात्मक संबंध कायम ठेवले होते. तेहरानने भारताच्या राजनैतिक प्रयत्नांची प्रशंसा केली होती. आणि भारताला थेट संघर्षात गुंतण्याऐवजी तणाव कमी करण्यावर आणि स्थिरता राखण्यावर भर देणारा देश, अशा स्वरूपात सादर केलं. भारतातील इराणच्या सर्वोच्च नेत्यांच्या प्रतिनिधीनेही, शस्त्रसंधीमधील भारताच्या भूमिकेची प्रशंसा केली आणि तणाव कमी करण्यासाठी उचललेल्या राजनैतिक पावलांचे तेहरान स्वागत करत असल्याचं नमूद केलं होतं.

अमेरिकेसोबत युद्ध सुरू असतानाही,  भारतासह मित्र देशांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून वाहतुकीची परवानगी देणे सुरू ठेवून, इराणने सद्भाव दाखवला होता.  एकीकडे प्रादेशिक तणावामुळे सागरी व्यापारावर परिणाम होत असतानाही उचललेल्या या पावलावरून नवी दिल्लीसोबतच्या संबंधाना तेहरान किती महत्व देतं, हे दिसून येतं. अलीकडील राजनैतिक चर्चेत चाबहार बंदराचे कामकाज सुरू ठेवण्यावर आणि निर्बंध शिथिल करून घेण्यावरही लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं. तज्ज्ञांच्या मते, चाबहार प्रकल्प भविष्यात एक महत्त्वाचा आर्थिक मार्ग ठरू शकतो, ज्यामुळे व्यापक भू-राजकीय तणावांपासून काही प्रमाणात अलिप्त राहून दोन्ही देशांचं हित साधता येऊ शकतं.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *