
चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरातकडून दोन-तीन नेत्यांच्या फोटोंवर ‘X’ (फुली) मारण्यात आली होती. मात्र, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोवर मात्र फुली मारलेली नसल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात सरकारला महत्त्वाचे पुरावे मिळाले असून, अशोक खरातला आयुष्यभर कारागृहात डांबण्यासाठी तगडी केस उभी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी केंद्रीय गृहमंत्रालयातील उच्चस्तरीय सूत्रांची माहिती आहे.