Headlines

पैश्यांची कमतरता होईल दूर, वरुथिनी एकादशीला करा ‘हे’ 3 सोपे उपाय

पैश्यांची कमतरता होईल दूर, वरुथिनी एकादशीला करा ‘हे’ 3 सोपे उपाय
पैश्यांची कमतरता होईल दूर, वरुथिनी एकादशीला करा ‘हे’ 3 सोपे उपाय


आपल्या सर्वांनाच माहिती आहे की एकादशी तिथीला सनातन धर्मात विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्याला येणाऱ्या एकादशीला भगवान विष्णूची पूजा आणि उपवास केला जातो. तर प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षात एकादशीचे व्रत केले जाते. वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला वरुथिनी एकादशीचे व्रत पाळली जाते. या दिवशी भगवान विष्णूचे विहित विधीनुसार व्रत आणि पूजा केली जाते. त्यामुळे वरुथिनी एकादशीला खूप महत्त्व आहे.

पौराणिक कथेनुसार स्वतः भगवान श्रीकृष्णांनी वरुथिनी एकादशीच्या व्रताचे महत्त्व सांगताना म्हटले आहे की, हे एकादशीचे व्रत पाळणे हे दहा हजार वर्षे तपश्चर्या करण्यासारखे आहे. या व्रताने मुलीचे लग्न लावून दिल्यासारखेच पुण्य मिळते. शिवाय, या व्रताच्या प्रभावाने सुखी जीवन लाभते. तसेच जीवनात पैश्यांची समस्या असेल तर आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी या दिवशी काही उपाययोजनाही केल्या जातात. चला या उपाय योजनांबद्दल जाणून घेऊयात.

वरुथिनी एकादशी व्रत 2026 कधी आहे?

पंचांगानुसार वैशाख कृष्ण पक्ष एकादशी तिथी 12 आणि 13 एप्रिलच्या मध्यरात्री 01 वाजून 16 मिनिटांनी सुरू होत आहे. आणि ही तिथी 13 आणि 14 एप्रिलच्या रात्री 01 वाजून 08 मिनिटांनी संपते.

त्यामुळे उदय तिथीनुसार, वरुथिनी एकादशीचा उपवास सोमवार, 13 एप्रिल 2026 रोजी पाळला जाईल.

वरुथिनी एकादशीच्या दिवशी करा हे उपाय

भगवान विष्णूची उपासना: वरुथिनी एकादशीच्या दिवशी पूजा करताना भगवान विष्णू यांचा ताज्या उसाचा रसाने अभिषेक करा. असे केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. शास्त्रानुसार असे केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि धनप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो.

तुळशीची पूजा: वरुथिनी एकादशीला तुळशीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण तुळस भगवान विष्णू यांना अत्यंत प्रिय आहे. या दिवशी तुळशीची पूजा करून तुपाचा दिवा लावा. त्यानंतर तुळशी मातेचे स्त्रोत्र पठण करा. असे केल्याने तुमच्या जीवनात सुख आणि शांती लाभते.

लक्ष्मी मातेच्या मंत्राचा जप: वरूथिनी एकादशीला लक्ष्मी मातेची पूजा करणे खूप फलदायी मानले जाते. या दिवशी विशेषतः “ओम श्रीं ह्रीं क्लीम श्री सिद्ध लक्ष्मीये नमः” या मंत्राचा जप करा.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *