Headlines

Asha Bhosle: आशा भोसले यांचं संघर्षमयी खासगी जीवन; वयाच्या 47 व्या वर्षी मिळालं दुसरं प्रेम

Asha Bhosle: आशा भोसले यांचं संघर्षमयी खासगी जीवन; वयाच्या 47 व्या वर्षी मिळालं दुसरं प्रेम
Asha Bhosle: आशा भोसले यांचं संघर्षमयी खासगी जीवन; वयाच्या 47 व्या वर्षी मिळालं दुसरं प्रेम


बॉलिवूड इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेत्री आशा भोसले यांचं मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. मल्टिऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचं निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. आशा भोसले यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. आठ दशकांहून अधिक काळापासून त्या संगीत क्षेत्रात कार्यरत होत्या. वयाच्या नव्वदाव्या वर्षी त्यांनी स्टेजवर लाइव्ह गाऊन सर्वांनाच थक्क केलं होतं. आपल्या करिअरमध्ये 12 हजारांहून अधिक गाणं गायलेल्या आशा भोसले या त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत होत्या.

1933 मध्ये महाराष्ट्रातील सांगलीत जन्मलेल्या आशा भोसले या गायक दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्या होत्या. त्या नऊ वर्षांच्या असतानाच वडिलांचं निधन झाल्याने मोठी बहीण लता मंगेशकर यांच्यासोबत त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास सुरुवात केली होती. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी घरातून पळून जाऊन गणपतराव भोसले यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं. त्यांचं हे नातं कुटुंब आणि बहीण लता मंगेशकर यांना मंजूर नव्हतं. त्यावेळी आशा भोसले फक्त 16 वर्षांच्या तर गणपतराव हे 31 वर्षांचे होते. या लग्नाच्या 11 वर्षांनंतर त्यांचा संसार मोडला.

आशा भोसले यांना त्यांच्या सासरच्या मंडळींकडून खूप वाईट वागणूक मिळाली. त्यांना मारहाण आणि घरगुती हिंसाचाराला सामोरं जावं लागलं होतं. या जाचाला कंटाळून अखेर एकेदिवशी त्यांनी मुलांना सोबत घेऊन पतीचं घर सोडलं. त्यावेळी त्या गर्भवती होत्या. एकीकडे गणपतराव यांच्याशी लग्नामुळे त्यांच्या घरच्यांनी बोलणं बंद केलं होतं, तर दुसरीकडे सासरी त्यांना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. आयुष्याच्या या कठीण काळात आशा भोसले यांनी टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी कुटुंबीयांनी त्यांना आधार दिला होता. माहेरी परतून त्यांनी मुलांची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.

आशा भोसले यांना पहिल्या लग्नातून तीन मुलं आहेत- हेमंत, वर्षा आणि आनंद भोसले. हेमंत हे संगीतकार होते आणि 2015 मध्ये कॅन्सरमुळे त्यांचं निधन झालं. तेव्हा ते 66 वर्षांचे होते. तर कन्या वर्षा भोसले या पत्रकार होत्या. 2012 मध्ये त्यांनी आत्महत्या केली होती. वर्षा यांनी हेमंत केंकरे यांच्याशी लग्न केलं होतं, परंतु लग्नाच्या काही वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर वर्षा या आई आशा भोसले यांच्यासोबतच राहू लागल्या होत्या. नैराश्यात गेल्यानंतर त्यांनी एकेदिवशी स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली होती.

पहिला संसार मोडल्यानंतर आशा भोसले या जवळपास 20 वर्षे एकट्याच राहिल्या होत्या. वयाच्या 47 व्या वर्षी त्यांनी दुसरं लग्न केलं. प्रसिद्ध संगीतकार आर. डी. बर्मन यांच्याशी त्यांनी दुसरं लग्न केलं होतं. आर. डी. बर्मन यांचंही हे दुसरं लग्न होतं आणि आशा भोसले यांच्यापेक्षा ते वयाने सहा वर्षांनी लहान होते. या दोघांनी मिळून फिल्म इंडस्ट्रीला अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *