Headlines

सावधान! अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर जाणे टाळा, मोठं संकट, थेट..

सावधान! अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर जाणे टाळा, मोठं संकट, थेट..
सावधान! अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर जाणे टाळा, मोठं संकट, थेट..


गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. मागच्या काही दिवसात राज्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला. यादरम्यान मोठी गारपिटही झाली. या गारपिटी आणि पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने नुकताच मोठा अंदाज वर्तवला आहे. दुपारच्यावेळी अतिमहत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळा. राज्यात पावसाच्या सावटानंतर आता उष्णता अधिक वाढताना दिसत आहे. पुढील 5 दिवस राज्यात उष्णता अधिक तीव्र होण्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे. अकोला येथे उच्चांकी 43.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये दमट आणि उष्ण वातावरण राहण्याची शक्यता आहे.

उष्णतेचा येलो अलर्ट हवामान विभागाने दोन्ही जिल्ह्यांमध्ये दिला. विदर्भासह राज्यात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. राज्यातील अनेक भागात पारा 40 च्या पार गेला. मालेगाव, सांगली, अमरावती, धुळे, जेऊर, जळगाव, सांगली, सोलापूर, नागपूर, वाशिम, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये पारा 41 अंश सेल्सिअसच्या पुढे होता.

नागरिकांनी दुपारी 12 ते 4 अतिमहत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. यादरम्यान उष्णाचा चटका अधिक तीव्र असेल. राज्यात पुढील काही दिवस सूर्य आग ओकताना दिसेल. थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्याचे तापमाना वाढले असून एप्रिल चे दुसऱ्या आठवड्यात ही तापमान चाळीशी पार गेले आहे . जिल्ह्यात एप्रिलच्या दुसऱ्यापंधरवड्यात उष्णतेची तीव्र लाट उसळण्याची शक्यता आहे.

18 ते 23 एप्रिल या कालावधीत तापमान 45 ते 46 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. सतत वाढणाऱ्या उष्णतेमुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून तापमानाचा पारा 41 अंशांवर पोहोचला आहे. वाढत्या उष्णतेमुळे जनजीवनावर परिणाम जाणवू लागला असून गजबजलेल्या रस्त्यांवरही ओस पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाने उष्माघात कक्ष सुरू करत आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *