Headlines

SRH vs RR : प्रफुल हिंगे-साकिब हुसैनचा कहर, हैदराबादने विजयरथ रोखला, राजस्थानचा 57 धावांनी धुव्वा

SRH vs RR : प्रफुल हिंगे-साकिब हुसैनचा कहर, हैदराबादने विजयरथ रोखला, राजस्थानचा 57 धावांनी धुव्वा
SRH vs RR : प्रफुल हिंगे-साकिब हुसैनचा कहर, हैदराबादने विजयरथ रोखला, राजस्थानचा 57 धावांनी धुव्वा


सनरायजर्स हैदराबादच्या प्रफुल हिंगे आणि साकिब हुसेन या युवा आणि वेगवान गोलंदाजांनी राजस्थान रॉयल्सला सलग आणि एकूण पाचवा सामना जिंकण्यापासून यशस्वीरित्या रोखलं आहे. सनरायजर्स हैदराबादने राजस्थानसमोर आयपीएल स्पर्धेच्या19 व्या मोसमातील (IPL 2026) 21 व्या सामन्यात 217 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र प्रफुल आणि साकिब जोडीने राजस्थानचा डाव 19 ओव्हरमध्ये 159 रन्सवर गुंडाळला. प्रफुल आणि साकिब या दोघांनी प्रत्येकी 4-4 विकेट्स घेत हैदराबादच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. हैदराबादने यासह राजस्थानला सलग पाचवा सामना जिंकण्यापासून रोखत आपला दुसरा विजय मिळवला. हैदराबादचा राजस्थान विरुद्धचा हा एकूण पाचवा विजय ठरला. तर राजस्थानला या 19 व्या मोसमात पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला.

सामन्याचा धावता आढावा

राजस्थानने टॉस जिंकून हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं. हैदराबादने या संधीचा फायदा घेत 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 216 धावांपर्यंत मजल मारली. हैदराबादसाठी कॅप्टन इशान किशन याने सर्वाधिक 91 धावा केल्या. हेनरिक क्लासेन याने 40 धावांची भर घातली. ट्रेव्हीस हेड याने 18 रन्स केल्या. तर अखेरच्या टप्प्यात नितीश कुमार रेड्डी आणि सलील अरोरा या दोघांनी महत्त्वपूर्ण खेळी केली ज्यामुळे हैदराबादला 200 पार पोहचता आलं. नितीशने 28 रन्स केल्या. तर सलीलने 13 चेंडूत 24 धावा केल्या. राजस्थानकडून जोफ्रा आर्चर याने 2 विकेट्स मिळवल्या. तर संदीप शर्मा, तुषार देशपांडे आणि रियान पराग या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

प्रफुल हिंगेचा दणका

वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल ही राजस्थानची सलामी जोडी युवा प्रुफल हिंगे याच्यासमोर कशी सुरुवात करते याकडे चाहत्यांचं लक्ष होतं. मात्र प्रफुलने कहर केला. प्रफुलने पहिल्याच ओव्हरमध्ये राजस्थानला 3 झटके दिले. प्रफुलने 1 बॉलच्या अंतराने राजस्थानला झटके दिले. प्रफुलने वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल आणि लुहान ड्री प्रिटोरियस या तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. या तिघांना भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर दुसऱ्याच ओव्हरमध्ये साकिब हुसैन याने यशस्वी जैस्वाल याचा 1 रनवर गेम केला. तर राजस्थानच्या डावातील तिसऱ्या ओव्हरमधील सहाव्या बॉलवर प्रफुलने कॅप्टन रियान पराग याला आऊट केलं. त्यामुळे राजस्थानची 3 ओव्हमध्ये 5 आऊट 9 अशी स्थिती झाली.

सहाव्या विकेटसाठी शतकी भागीदारी

त्यानंतर रवींद्र जडेजा आणि डोनोवान फेरिरा या दोघांनी सहाव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या जोडीच्या भागीदारीमुळे राजस्थानला विजयाची आशा होती. मात्र ही जोडी फुटताच हैदराबादचा विजय जवळपास निश्चित झाला. जडेजा आणि डोनोवान या दोघांनी 72 बॉलमध्ये 118 रन्स केल्या.

स्कोअरकार्ड


डोनोवान याने राजस्थानसाठी सर्वाधिक 69 रन्स केल्या. डोनोवाननंतर जडेजाही आऊट झाला. जडेजाने 45 रन्स केल्या. जोफ्रा आर्चर याने 2 धावा जोडल्या. अखेरच्या क्षणी तुषार देशपांडे याने 3 षटकारांसह नाबाद 25 धावा करत पराभवातील अंतर कमी केलं. तर नांद्रे बर्गर याने नॉट आऊट 3 रन्स केल्या.

प्रफुल हिंगे आणि साकिब हुसैन या जोडीने कमाल केली. दोघांनी प्रत्येकी 4-4 विकेट्स मिळवल्या. तर एशान मलिंगा याने 2 विकेट्स मिळवत साकिब आणि प्रफुलच्या सोबतीने हैदराबादचं पॅकअप केलं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *