Headlines

56 तासांपर्यंतच्या बॅटरी लाईफसह रियलमीने लाँच केलेले ‘हे’ नवीन इअरबड्स

56 तासांपर्यंतच्या बॅटरी लाईफसह रियलमीने लाँच केलेले ‘हे’ नवीन इअरबड्स
56 तासांपर्यंतच्या बॅटरी लाईफसह रियलमीने लाँच केलेले ‘हे’ नवीन इअरबड्स


रियलमी कंपनीने त्यांचे नवीन इअरबड्स भारतात लाँच केले आहेत. ज्याचे नाव Realme Buds T500 Pro TWS आहे. तर या बड्सचे प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये 12.4mm ड्रायव्हर्स आणि हाय-रेस ऑडिओ वायरलेस यांचा समावेश आहे. ततसेच मल्टी-डिव्हाइस कनेक्टिव्हिटी, गेमिंग परफॉर्मन्स आणि 56 तासांपर्यंत बॅटरी लाईफ मिळते. या इअरबड्समध्ये AI-आधारित ॲडॅप्टिव्ह ट्युनिंगसह 50dB पर्यंत ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशनची सुविधा देखील आहे. असे म्हटले जाते की, हे इअरबड्स सध्याच्या इतर रियलमी बड्सच्या पर्यायांपेक्षा वजनाने हलके आहेत आणि त्यांची केस अधिक कॉम्पॅक्ट आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या इअरबड्सची किंमत फिचर्स जाणून घेऊयात.

भारतात Realme Buds T500 Pro TWS ची किंमत

या इअरबड्सची किंमत 2 हजार 799 असून ते 23 एप्रिलपासून Amazon, Flipkart, Myntra आणि Realme India च्या वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध होतील. हे इअरबड्स लेमन कोला, चॉकलेट आणि ऑरेंज मिंट या रंगांमध्ये उपलब्ध आहेत. 23 एप्रिल ते 26 एप्रिल दरम्यान चालणाऱ्या पहिल्या सेलचा भाग म्हणून हे इअरबड्स 200 रूपयांच्या सवलतीसह उपलब्ध असतील.

Realme Buds T500 Pro TWS ची वैशिष्ट्ये

12.4 मिमी ड्रायव्हर्स असलेले हे इअरबड्स हाय-रेस ऑडिओ वायरलेसला सपोर्ट करतात. यामध्ये LHDC 5.0 कोडेक देखील आहे, जो 24-बिट आणि 96kHz पर्यंत उच्च-गुणवत्तेचे ऑडिओ ट्रान्समिशन देतो.

यामध्ये टायटॅनियम-प्लेटेड डायफ्रामचा वापर केला आहे, ज्यामुळे अधिक खोल बास आणि अधिक प्रभावी साउंडस्टेज मिळतो. या इअरबड्समध्ये अनेक EQ मोड्स आहेत, जे Realme Link ॲपद्वारे आणखी कस्टमाइझ केले जाऊ शकतात.

यामध्ये MindFlow मोड देखील आहे, जो ऐकण्याचा अनुभव अधिक आरामदायक बनवतात.

हे इअरफोन्स 5000Hz पर्यंतच्या रेंजसह 50dB पर्यंतच्या ANC (ॲक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन) ला देखील सपोर्ट करतात. यामध्ये एक रिअल-टाइम AI सिस्टीम वापरली जाते, जी तुमच्या कानांच्या आकारानुसार आणि सभोवतालच्या वातावरणानुसार आपोआप जुळवून घेते. यामध्ये स्पष्ट कॉल्ससाठी सहा-मायक्रोफोन सेटअप देखील आहे आणि ते टू-वे व फेस-टू-फेस दोन्ही मोड्समध्ये लाइव्ह ट्रान्सलेशन सपोर्ट करतात.

कनेक्टिव्हिटीसाठी, हे इअरबड्स ब्लूटूथ व्हर्जन 6.1 वापरतात, ज्यामुळे तुम्ही एकाच वेळी तीन उपकरणांपर्यंत कनेक्ट करू शकता. गेम खेळताना किंवा व्हिडिओ पाहताना चांगल्या अनुभवासाठी, यात 45ms चा खूप कमी लेटन्सी देखील आहे.

यात ‘फाईंड माय इअरबड्स’ हे वैशिष्ट्य देखील आहे, ज्यामुळे हरवल्यास ते शोधणे सोपे होते. चार्जिंग केससह हे वायरलेस हेडसेट 56 तासांपर्यंत बॅटरी लाईफ देण्याचा दावा करते. हे इअरबड्स ANC शिवाय 13.5 तासांपर्यंत आणि ANC चालू असताना आठ तासांपर्यंत टिकू शकतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *