Headlines

Bhiwandi | भिवंडीत गॅस पाईपलाईनला गळती; जेसीबीच्या धक्का लागताच…अनर्थ टाळण्यासाठी मोठी तारांबळ!

Bhiwandi | भिवंडीत गॅस पाईपलाईनला गळती; जेसीबीच्या धक्का लागताच…अनर्थ टाळण्यासाठी मोठी तारांबळ!
Bhiwandi | भिवंडीत गॅस पाईपलाईनला गळती; जेसीबीच्या धक्का लागताच…अनर्थ टाळण्यासाठी मोठी तारांबळ!


भिवंडीतील राजनोली नाका परिसरात महानगर गॅसच्या पाईपलाईनमध्ये गळती झाल्याची घटना घडली असून, त्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच महानगर गॅसचे अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

प्राथमिक माहितीनुसार, परिसरात सुरू असलेल्या कामादरम्यान जेसीबी मशीनचा धक्का गॅस पाईपलाईनला लागल्याने गळती सुरू झाली. गॅस गळतीची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी तत्काळ उपाययोजना सुरू केल्या.

संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रसंगावधान राखत संबंधित भागातील गॅस पुरवठा तातडीने बंद करण्यात आला. तसेच परिसर सुरक्षित करण्यासाठी अग्निशमन दल आणि महानगर गॅसच्या पथकाने आवश्यक ती खबरदारी घेतली.

या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, गॅस गळतीचे नेमके कारण आणि झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू असून, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *