Headlines

SAW vs INDW : टीम इंडियासाठी करो या मरो सामना, तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला रोखणार?

SAW vs INDW : टीम इंडियासाठी करो या मरो सामना, तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला रोखणार?
SAW vs INDW : टीम इंडियासाठी करो या मरो सामना, तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला रोखणार?


वुमन्स टीम इंडियाची बुधवारी 22 एप्रिलला टी 20 मालिकेत कसोटी लागणार आहे. सध्या टीम इंडियाची महिला ब्रिगेड दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20i मालिकेत 2 सामन्यानंतरही विजयाचं खातं उघडण्यात अपयशी ठरली आहे. टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 0-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी तिसरा सामना हा मालिकेच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा आहे. टीम इंडियाला मालिकेतील आव्हना कायम राखायचं असेल आणि यजमान दक्षिण आफ्रिकेला मालिका जिंकण्यापासून रोखायचं असेल तर तिसऱ्या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे महिला ब्रिगेडच चांगलाच कस लागणार आहे. अशात महिला ब्रिगेड सलग 2 पराभवानंतर तिसऱ्या सामन्यात कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या तिसऱ्या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात टीम इंडियाची महिला ब्रिगेड तिसऱ्या सामन्यात विजयाचं खातं उघडण्यासह मालिका बचावण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर दक्षिण आफ्रिका विजयी हॅट्रिकसह मालिका नावावर करण्यापासून एक पाऊल दूर आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया वुमन्स तिसरा टी 20i सामना कधी?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया वुमन्स तिसरा टी 20i सामना बुधवारी 22 एप्रिलला होणार आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया वुमन्स तिसरा टी 20i सामना कुठे?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया वुमन्स तिसरा टी 20i सामना वँडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग इथे होणार आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया वुमन्स तिसऱ्या टी 20i सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया वुमन्स तिसऱ्या टी 20i सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 9 वाजता टॉस होईल.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया वुमन्स तिसरा टी 20i सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया वुमन्स तिसरा टी 20i सामना टीव्हीवर जिओहॉटस्टार एपवर लाईव्ह पाहायला मिळेल. तर लाईव्ह मॅच जिओहॉटस्टार एपद्वारे मोबाईल-लॅपटॉपवर लाईव्ह पाहायला मिळेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *