Headlines

Dhurandhar : रणवीरच्या सासऱ्यांना कसा वाटला ‘धुरंधर’ ? रिलीजनंतर अनेक महिन्यांनी प्रकाश पदुकोण म्हणाले..

Dhurandhar : रणवीरच्या सासऱ्यांना कसा वाटला ‘धुरंधर’ ? रिलीजनंतर अनेक महिन्यांनी प्रकाश पदुकोण म्हणाले..
Dhurandhar : रणवीरच्या सासऱ्यांना कसा वाटला ‘धुरंधर’ ? रिलीजनंतर अनेक महिन्यांनी प्रकाश पदुकोण म्हणाले..


प्रकाश पडूकोण यांना कसा वाटला धुरंधर ?

आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंहची प्रमुख भूमिका असलेला ‘धुरंधर’ दोन भागांत रिलीज झाला आणि दोन्ही चित्रपटांनी रेकॉर्डतोड कमाई केली.या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि बॉक्स ऑफीसवर मोठा गल्ला जमवण्यातही चित्रपट यशस्वी ठरला. अनेक सेलिब्रिटींनीही चित्रपटाचं तोंडभरून कौतुक केलं. आदित्य धरचं दिग्दर्शन आणि रणवीर सिंहचं काम अनेकांना खूप आवडलं. त्याच्या सिक्वेललाही खूप प्रतिसाद मिळाल.

अशातच हे दोन्ही चित्रपट रिलीज झाल्यावर अनेक महिन्यांनी आता रणवीर सिंहच्या कुटुंबातून या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया आली आहे. अभिनेत्री दीपिका पडूकोणचे वडील, रणवीरचे सासरे आणि प्रसिद्ध बॅटमिंटनपटू, प्रकाश पडूकोण यांनी धुरंधर पाहिला . त्यांना चित्रपट कसा वाटला, काय आवडलं, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.

प्रकाश पडूकोण यांच्याकडून धुरंधरचं कौतुक

प्रकाश पडूकोण यांनी नुकतीच एक मुलाखत दिली, ज्यामध्ये त्यांनी धुरंधरचं तोंडभरून कौतुक केलं. ‘चांगला चित्रपट आहे. त्यामध्ये सर्वच कलाकारांनी उत्तम काम केलं आहे ,’ असं ते म्हणाले. “आम्हाला या चित्रपटात हिंसाचार जरा जास्तच वाटला, पण बहुतांश लोकांना तो आवडल्यामुळे, मला वाटते की ती गोष्टही सर्वात महत्त्वाची आहे, ” असं पुढे बोलताना प्रकाश पडूकोण यांनी सांगितलं

यावेळी प्रकाश पडूकोण यांनी रणवीरसोबतच्या नात्यावरही भाष्य केलं. मुलगी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह या दोघांशीही आपलं अत्यंत जवळचे नातं आहे आणि ते अनेकदा एकत्र कौटुंबिक सहलींवर जातात, असं त्यांनी नमूद केलं. चित्रपटसृष्टीबद्दल जाणून घेण्याची इच्छा असल्याने मी अनेकदा रणवीरला चित्रपटांविषयी विचारत असतो, तर रणवीरही अनेकदा मला खेळांविषयी विचारत असतो, असंही त्यांनी सांगितलं.

धुरंदरची बक्कळ कमाई

आदित्य धरने दिग्दर्शित केलेला रणवीर सिंहचा ‘धुरंधर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अत्यंत यशस्वी ठरला आणि त्याने ब्लॉकबस्टर कामगिरी केली. या चित्रपटात अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन, सारा अर्जुन आणि राकेश बेदी यांसारख्या अनेक कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. पहिल्या भागाच्या यशानंतर, निर्मात्यांनी या वर्षी 19 मार्च रोजी ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट प्रदर्शित केला, ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. चित्रपाटने भरपूर गल्ला कमवत अनेक रेकॉर्ड्स मोडले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *