
UPSC Exam Viral Question: केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. या परीक्षेच्या मुलाखत ही कायम चर्चेत असते. युपीएससीची तयारी करणारे तरूण मुलाखतीची कसून तयारी करतात. या मुलाखतीत तार्किक आणि बुद्धीचा कस लावणारी, कसोटी पाहणारे प्रश्न विचारले जातात. या प्रश्नामुळे चांगल्या चांगल्या उमेदवारांची दमछाक होते. या मुलाखतीमधील अशाच एका प्रश्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. 100 रुपयांची नोट न दुमडता, न फाडता, तिची घडी करता तुम्हाला ती अर्धी कशी करता येईल, असा तो प्रश्न आहे. समाज माध्यमावर हा प्रश्न सध्या चर्चिलच्या जात आहे. काय आहे त्याचे उत्तर?
सोप्या प्रश्नाचे रंजक उत्तर
हा प्रश्न वाचताच तो अवघड आणि किचकट वाटतो. न दुमडता, घडी न करता, न फाडता कोणतीही नोट अर्धी कशी करता येऊ शकते, हे मन अगोदरच जाहीर करते. पण हा सवालच वैशिष्ट्यपूर्ण आहे. तुमची विचारशक्ती आणि आकलन शक्तीची परीक्षा पाहण्यासाठी असे ट्रिकी प्रश्न हटकून विचारल्या जातात. याचे उत्तर अगदी सोप असले तरी कधी अशा प्रश्नांचा सामना न केल्याने अडचण येते.
आता 100 रुपयांची नोट अर्धी करायची म्हणजे तिचे खरोखर दोन तुकडे करणे असा होत नाही. हा शब्द छल म्हणा हवं तर, त्याचा अर्थ शंभर रुपयांच्या नोटेचे मूल्य अर्धे करणे असे आहे. म्हणजे सोप्या भाषेत दोन 50 रुपये नोट घेऊन येणे. म्हणजेच न दुमडता, न घडी करता, न फाडता शंभर रुपयांची नोट अर्धी करणे.
UPSC मध्ये विचारण्यात आला प्रश्न
हा प्रश्न केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलाखतीत हा प्रश्न विचारण्यात आला. उमेदवार हा अशा प्रश्नाकडे कसा बघतो, त्याची विचार करण्याची क्षमता, त्याची उत्तर देण्याची रचनात्मक आणि व्यावहारिक कौशल्य याची परीक्षा होते. युपीएससीच्या मुलाखतीत योग्य उत्तर देण्यापेक्षा उमेदवार विचार कसा करतो. प्रश्न सोडवण्यासाठी काय युक्ती वापरतो, तो काय तर्क देतो यालाही महत्त्व असते. त्याच्या या विचार प्रक्रियेला अधिक महत्त्व असते. सोशल मीडियावर हा प्रश्न व्हायरल झाल्यावर अनेक जणांना तो क्लिष्ट म्हणून सोडून दिला. तर काहींनी त्यावर नाहक डोकं घासलं. त्यावर काहींनी अत्यंत समर्पक आणि योग्य उत्तर दिलं. व्यावहारिक ज्ञान का महत्त्वचं आहे, याचे हे खास उदाहरण आहे. अनेकांना हा प्रश्न सोडवण्यावर भर दिला. तेव्हा तुम्ही या प्रश्नासाठी काय शक्कल लढवली आणि काय काय विचार केला हे महत्त्वाचं ठरतं.