
कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे शिवाजी कोण होता? या पुस्तकावरून पुन्हा वाद पेटला आहे. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिव्यांची लाखोली वाहिल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. यानंतर अनेक वादविवाद झाले. या प्रकरणात आता महत्त्वाची अपडेट आली आहे.
कथित ऑडिओ क्लिपमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर दाखवताना आमदार संजय गायकवाड यांची जिभ घसरल्याचं दिसलं. या ऑडिओ क्लिपमध्ये ते शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख का केला याविषयी प्रकाशक प्रशांत आंबी यांना जाब विचारत आहेत. आता संजय गायकवाड यांनी संबंधित प्रकरणात त्यांच्या अपशब्दांबद्दल माफी मागितली आहे. इतकेच नाही, तर स्पष्ट केले की, त्यांचा हेतू महाराजांचे नाव आदरार्थ घ्यायला लावणे, असा होता.