Headlines

महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठीत बोललेच पाहिजे, प्रताप सरनाईक यांचा रिक्षा-टॅक्सी चालकांना इशारा

महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठीत बोललेच पाहिजे, प्रताप सरनाईक यांचा रिक्षा-टॅक्सी चालकांना इशारा
महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठीत बोललेच पाहिजे, प्रताप सरनाईक यांचा रिक्षा-टॅक्सी चालकांना इशारा


मराठी राज्याची राज्यभाषा आहे ती तुम्हाला आलीच पाहिजे. तुमची अडेलतट्टू भूमिका चालणार नाही. हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे असा सज्जड इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी टॅक्सी – रिक्षा चालकांना दिला आहे. येत्या २८ मार्च रोजी या संदर्भात मंत्रालयात बैठकीच आयोजन केले असून सर्वांच्या शंकांचे निरसन केले जाईल असेही सरनाईक यांनी म्हटले आहे.

१ मे पासून राज्यातील रिक्षा – टॅक्सी- उबर-ओला चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधावा लागेल असा निर्णय राज्य सरकार घेत आहे. या संदर्भात सर्व संबंधितांशी संवाद साधण्यासाठी येत्या २८ मार्च रोजी या संदर्भात मंत्रालयात बैठकीच आयोजन केले आहे. या निर्णयाला शिवसेनेचे नेते संजय निरुपम आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केला आहे. सरकारमधीलच काही घटक या निर्णयाच्या विरोधात बोलत असल्याने विचित्र स्थिती ओढावलेली आहे. या संदर्भात येत्या २८ मार्च रोजी मंत्रालयातील बैठकीत सर्व भागधारकांशी चर्चा केली जाईल आणि त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यांनी म्हटले आहे.

सरनाईक यांनी म्हटले आहे की ज्यांचा ज्यांचा विरोध आहे त्यांच्या शंकाचे निरासण केले जाईल. महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे महाराष्ट्राच्या कायद्याचे पालन सर्वांनी केले पाहीजे.परिवहन मंत्री म्हणून मी कुठलेही नवीन कायदे आणले नाही. जुन्याच कायद्याची अंमलबजावणी करतोय.मराठी ही राज्य़ाची राजभाषा आहे. तुम्हाला मराठी आलीच पाहीजे.तुमची अडेलतट्टूपणाची भूमिका चालणार नाही. हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे.

या संदर्भात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आक्षेप नोंदवला असल्याचे सांगितले असता त्यावर सदावर्ते यांचा आणि रिक्षाचालकांचा काही संबध नाही असेही सरनाईक यांनी म्हटले आहे. अंजली निरूपम यांचा मला काल फोन आला होता, या संदर्भात त्यांनी मला माहिती विचारली. त्यांनी मला पत्र दिले आहे. मी संजय निरुपम यांच्या मागणीवरून २८ एप्रिलला मंत्रालयात बैठकीचा सुद्धा आयोजन केले आहे.

काही लोकांनी भडकवण्याचे काम केले

काही लोकांनी सर्वसामान्य रिक्षावाल्यांना भडकवण्याचे काम केले आहे. त्यांना असे सांगितले की तुमचे लायसन्स रद्द होईल, तुमचा परवाना रद्द होईल, तुमचे जे परमिट दिले ते रद्द होईल. माझे हे म्हणणे आहे की १९८९ चा हा कायदा आहे. २०१९ मध्ये आम्ही सुधारणा केली होती. कालही आम्ही त्यांच्यात सुधारणा करून त्या कायद्यांमध्ये जे काही ओला आणि उबर तसेट रॅपिड टू व्हीलरचे जे प्रवासी आहेत. त्या पॉलिसीमध्ये सुद्धा या कायद्याचे आणि मराठी भाषेची अंमलबजावणी करण्याची सूचना आम्ही मांडली आहे असेही प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

आम्ही कोणाचाही रोजगार हिसकावणार नाही

संजय निरुपम यांनी विरोध केलेला नाही, त्यांनी म्हटलंय की जबरदस्तीने जर काही कराल तर ते योग्य होणार नाही रोजी रोटीचा प्रश्न आहे. मी स्पष्टपणे सांगतो हे सुसंस्कृत राज्य आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये नोकरी धंदा व्यवसाय निर्माण करणारे हे राज्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार अतिशय चांगल्या प्रकारचे काम करत आहे, त्या माध्यमातून आम्ही पुढे जात आहोत. अशाप्रकारे आम्ही कोणाचाही रोजगार हिसकावून घेणार नाही असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.

मराठी भाषेचा आदर करायलाच हवा

महाराष्ट्रात मराठी भाषेचा आदर करायलाच हवा. तुम्ही आडमुठेपणा कराल तुम्ही जर सांगाल आम्ही हिंदी शिवाय दुसरी भाषा बोलणार नाही तर हे चालणार नाही हा महाराष्ट्र आहे सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. परिवहन मंत्री म्हणून आमच्या डिपार्टमेंटच्या लोकांची जबाबदारी आहे, तुमच्या लायसन्सची पाहणी करणे, तुम्हाला बॅच दिला आहे तो योग्य आहे का तुम्ही कायद्याचे पालन करून ऑटो रिक्षा चालवता आहात का ?  असेही सरनाईक यावेळी म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *