Headlines

हा तर उघड उघड लव्ह जिहाद; दीपिका-शोएबचं कौतुक करणाऱ्या अभिनेत्रीवर भडकले नेटकरी

हा तर उघड उघड लव्ह जिहाद; दीपिका-शोएबचं कौतुक करणाऱ्या अभिनेत्रीवर भडकले नेटकरी
हा तर उघड उघड लव्ह जिहाद; दीपिका-शोएबचं कौतुक करणाऱ्या अभिनेत्रीवर भडकले नेटकरी


‘ससुराल सिमर का’ या मालिकेत भूमिका साकारणारी अभिनेत्री जयती भाटिया नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपिका कक्करविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. या मालिकेत दोघींनी एकत्र काम केलं होतं आणि याच मालिकेदरम्यान दीपिकाचं शोएब इब्राहिमसोबत अफेअर सुरू झालं होतं. दीपिका आणि शोएबने लग्न केलं असून त्यांना एक मुलगासुद्धा आहे. लग्नाच्या वेळी तिने धर्मांतर करून ‘फातिमा’ असं नाव बदललं होतं. यावरून आता नेटकऱ्यांनी जयतीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. दीपिका आणि शोएबच्या लग्नाला नेटकऱ्यांनी थेट ‘लव्ह जिहाद’ असं म्हटलंय.

“मला दीपिका खूप आवडते. मी आजही तिला सिमर म्हणूनच हाक मारते. ससुराल सिमर का या मालिकेसाठी दीपिका आणि शोएब यांनी जेव्हा शूटिंगला सुरुवात केली होती, तेव्हा दोघंही संवेदनशील स्वभावाचे होते. मी त्यांच्या आयुष्यातील तो टप्पा फार जवळून पाहिला आहे. मी त्या दोघांना एकत्र येताना पाहिलंय. दीपिकाचं पहिलं लग्न मोडत होतं आणि जेव्हा शोएबसोबत तिची जवळीक वाढली होती, हे सर्व मी पाहिलं होतं. मला त्या दोघांचा खूप अभिमान वाटतो. कारण ज्याप्रकारे ते दोघं सोबत पुढे गेले आणि त्यांच्यातील नातं इतकं घट्ट आहे की त्याची अपेक्षा मीसुद्धा केली नव्हती. माझ्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे की त्यांच्यातील नातं दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चाललं आहे. दीपिकाने आधी शोएब आणि त्याच्या कुटुंबीयांचा सांभाळ केला आणि आता शोएब आणि त्याचे कुटुंबीय दीपिकाची काळजी घेत आहेत”, अशा शब्दांत जयती भाटियाने कौतुक केलं.

जयतीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर केल्याचा अभिमान आहे का’, असा सवाल एकाने केला. तर ‘शोएब आणि त्याच्या कुटुंबीयांनी दीपिकाला सर्वांपासून, इंडस्ट्रीपासून, कामापासून दूर केलं आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘यालाच तर लव्ह जिहाद म्हणतात’, असं एका युजरने लिहिलं आहे. ‘इतकंच प्रेम होतं तर दीपिकाला दीपिकाच राहू दिलं असतं, तिचं धर्मांतर केलं नसतं’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी टीका केली.

दीपिकाला काही महिन्यांपूर्वी कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यावरील उपचारानंतर तिच्या पोटात सिस्ट आढळले होते. गेल्या काही काळापासून ती सतत आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करतेय.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *