Headlines

Gadchiroli Tempreture Update | विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

पूर्व विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून तापमानाचा पारा 42 ते 47 अंश सेल्सिअसदरम्यान पोहोचला असून, गडचिरोलीतही 42 अंश तापमानाची नोंद झाली आहे. उकाड्यामुळे दुपारच्या वेळेत जनजीवन विस्कळीत झाले असून, गडचिरोली–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरही वाहतूक कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. नेहमी गजबजलेला हा महामार्ग दुपारी जवळपास निर्मनुष्य दिसत असून, अत्यावश्यक कामासाठीच काही प्रवासी बाहेर पडताना दिसत आहेत.
उष्णतेच्या तीव्रतेमुळे नागरिकांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, गडचिरोलीसह लगतच्या तेलंगणा आणि छत्तीसगड राज्यांमध्येही तापमानात वाढ झाली आहे. तसेच विदर्भातील गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्येही उष्णतेचा तडाखा जाणवत आहे. एकूणच, वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *