Headlines

Bachchu Kadu | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले….

Bachchu Kadu | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले….
Bachchu Kadu | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले….


राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. या निर्णयानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर बोलताना कडू म्हणाले की, “हा निर्णय मजबुरीचा नसून परिस्थितीचा आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, प्रहारच्या नावावर निवडणुका जिंकणे कठीण जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये होती. “जनतेने नाकारलं म्हणून नेत्याकडे जावं लागलं,” असेही ते म्हणाले. गेल्या 25 वर्षांपासून जनतेलाच आपला नेता मानत असल्याचे सांगत त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख केला.
दरम्यान, या निर्णयावर टीका करत शिवसेना ठाकरे गटाच्या च्या मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून कडूंवर निशाणा साधण्यात आला. “मिंधे गटात विलीन होऊन कडूंनी जिवंत समाधी घेतली,” अशी टीका करण्यात आली आहे.
तसेच, कडूंनी आपल्या कार्यकर्त्यांबाबत बोलताना अनेक जण विविध पक्षांत गेले असल्याचे सांगितले. “प्रहारच्या नावाने निवडून येणं कठीण असल्याची जाणीव त्यांना होती,” असे त्यांनी नमूद केले. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *