Headlines

IND vs AFG 3rd ODI: अफगाणिस्तानचं टीम इंडियासमोर विजयासाठी 219 धावांचं आव्हान, प्रसिद्ध कृष्णाचा ‘पंच’

IND vs AFG 3rd ODI: अफगाणिस्तानचं टीम इंडियासमोर विजयासाठी 219 धावांचं आव्हान, प्रसिद्ध कृष्णाचा ‘पंच’
IND vs AFG 3rd ODI: अफगाणिस्तानचं टीम इंडियासमोर विजयासाठी 219 धावांचं आव्हान, प्रसिद्ध कृष्णाचा ‘पंच’


IND vs AFG 3rd ODI: अफगाणिस्तानचं टीम इंडियासमोर विजयासाठी 219 धावांचं आव्हान, प्रसिद्ध कृष्णाचा ‘पंच’Image Credit source: BCCI Twitter

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल अफगाणिस्तानच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय फसला असंच म्हणावं लागेल. अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या 218 धावांवर बाद झाला आणि विजयासाठी 219 धावांचं आव्हान दिलं आहे. या सामन्यात अफगाणिस्तानची सुरूवात निराशाजनक झाली. भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याने अफगाणिस्तानला बॅकफूटवर ढकललं. त्याने 8.2 षटकात 23 धावा देत 5 विकेट काढल्या. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे अफगाणिस्तानला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. अफगाणिस्तानकडून हशिमतुल्लाह शाहिदीने 102, तर अझमतुल्ला ओमरझाई याने 50 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही.

अफगाणिस्तानला 5 धावांवर असताना रहमनुल्ला गुरबाजच्या रूपाने पहिला धक्का बसला. त्यानंतर रहमत शाह 5 धावा करून बाद झाला. तो तंबूत परतत नाही तेच इब्राहिम झाद्रान 11 धावांवर तंबूत परतला. दार्विश रसूल फक्त 1 धाव करू शकला. संघाची नाजूक असताना हशमतुल्लाह शाहिदी आणि अझमतुल्लाह ओमरझाई यांनी डाव सावरला. पाचव्या विकेटसाठी या दोघांनी 105 धावांची भागीदारी केली. अझमतुल्लाह ओमरझाई 56 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकार मारत 50 धावांवर बाद झाला. त्यानंतर हशमतुल्लाहची जोडी मोहम्मद नबीसोबत जमली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी केली. नबी 21 धावांवर बाद झाला. त्यानंतर हशमतुल्लाहने डाव पुढे नेत 131 चेंडूत 102 धावांची खेळी केली. त्याने 13 चौकार आणि 1 षटकार मारला. राशीद खान 5, एएण घझनफर 1 आणि फरीद अहमद मलीक 0 धावांवर बाद झाले.

भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने भेदक गोलंदाजी करत पाच विकेट काढले. त्यानंतर गुरनूर ब्रार, प्रिन्स यादव आणि हर्ष दुबे यांनी प्रत्येकी एक विकेट काढली. तर दोन विकेट धावचीत झाल्या. आता भारतासमोर 219 धावांचं आव्हान असून अफगाणिस्तानला व्हाईट वॉश देण्याची संधी आहे. भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील सुरूवातीचे 2 सामने जिंकले असून मालिका आधीच खिशात घातली आहे. आता तिसरा सामना जिंकून व्हाईट वॉश देण्याची संधी आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *