Headlines

Parbhani| परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला, अनेकजण जखमी

Parbhani| परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला, अनेकजण जखमी
Parbhani| परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला, अनेकजण जखमी


परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथे शनिवारी मोठी दुर्घटना घडली असून हनुमान मंदिराच्या सभामंडपाचा पिलर आणि छताचा काही भाग अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मंदिराच्या सभामंडपाचा भाग कोसळल्यामुळे अनेक भाविक जखमी झाले आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, ढिगाऱ्याखाली काही भाविक अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून बचाव पथके युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य करत आहेत. घटनास्थळी पोलिस, महसूल प्रशासन, आपत्कालीन यंत्रणा आणि वैद्यकीय पथके दाखल झाली आहेत.

शनिवार असल्यामुळे मंदिर परिसरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होती. त्याचवेळी ही दुर्घटना घडल्याने मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून अधिकृत आकडेवारीची प्रतीक्षा असून, बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच नुकसानाचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.

सध्या संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण असून प्रशासनाकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *