Headlines

MI vs LSG: लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा खेळणार? मुंबई इंडियन्सने घेतला मोठा निर्णय

MI vs LSG: लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा खेळणार? मुंबई इंडियन्सने घेतला मोठा निर्णय
MI vs LSG: लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा खेळणार? मुंबई इंडियन्सने घेतला मोठा निर्णय


MI vs LSG: लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा खेळणार? मुंबई इंडियन्सने घेतला मोठा निर्णयImage Credit source: PTI

आयपीएल 2026 स्पर्धेतील 47व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होत आहे. या दोन्ही संघांची स्पर्धेतील स्थिती नाजूक आहे. त्यामुळे स्पर्धेत आत्मसन्मानासाठी विजय महत्त्वाचा आहे. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सची पराभवाची मालिका सुरूच आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून चाहत्यांना खूश करण्याचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, या सामन्यात रोहित शर्मा खेळणार की नाही? हा देखील प्रश्न आहे. मागच्या काही सामन्यांपासून रोहित शर्मा बेंचवर बसलेला दिसतो. मात्र मैदानात कधी उतरणार याची प्रतीक्षा त्याच्या चाहत्यांना आहे. असं असताना लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात खेळायचं की नाही हा निर्णय मुंबई इंडियन्सने त्याच्यावरच सोडला आहे. म्हणजेच आता रोहित शर्मा स्वत: निर्णय घेईल की त्याला खेळायचं आहे की नाही?

आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माला दुखापत झाली होती. तेव्हापासून रोहित शर्मा बेंचवर बसलेला दिसत आहे. पण आता रोहित शर्मा लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा या सामन्यापूर्वी एक फिटनेस टेस्ट देईल. त्यात पास झाला तर मैदानात खेळताना दिसू शकतो. विशेष म्हणजे रोहित शर्माने नेट्समध्ये काही तास फलंदाजी केली. त्यामुळे फिटनेस टेस्ट पास होईल असं दिसत आहे. पण क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध खेळायचं की नाही निर्णय व्यवस्थापनाने रोहित शर्मावर सोडला आहे.

मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत आणि त्यापैकी 7 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. रोहित शर्मा पहिल्या चार सामन्यात मुंबई इंडियन्सचा भाग होता. तर मागच्या पाच सामन्यांपासून हॅमस्ट्रिंग इंजरीमुळे खेळत नाही. पण आता फिट अँड फाईन असून खेळण्याची शक्यता आहे. त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं तर रॉबिन मिन्झची जागा घेऊ शकतो. रोहित शर्मा परतल्यास ओपनिंग जोडीही बदलली जाईल. रोहित शर्मा आणि रिकल्टन जोडी ओपनिंग करेल. तर विल जॅक्स तिसऱ्या क्रमांकावर उतरेल. रोहित शर्माने आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यात 165.06 च्या स्ट्राईक रेटने आणि 45 पेक्षा जास्तीच्या सरासरीने 137 धावा केल्या आहेत. यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *