
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी काल पार पडली. यामध्ये अक्षय कर्डिले यांनी शानदार विजय मिळवला आहे. मात्र, यानंतर राहुरतील राजकारण तापले आहे. नेमकं काय घडलं?
भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून जल्लोष केला. अक्षय कर्डिले यांचा सामना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गोविंद मोकाटे यांच्याशी झाला होता. या निवडणुकीत अक्षय कर्डिले यांनी 1 लाखापेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला आहे.
आता विरोधी गोविंद मोकाटे यांनी EVM वर संशय व्यक्त केला आहे. या निकालांविरोधात ते थेट न्यायालयात जाणार असल्याचंही समोर आले आहे.
इतकेच नाही, तर त्यांनी भाजपवर पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोपही केला आहे. या प्रकरणानंतर राहुरीतील पुढील घडामोडींकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.