Headlines

असा रेकॉर्ड कोणीच केला नाही, 2026 मधील या गाण्याने ‘धुरंधर 2’ ला टाकलं मागे, मिळाले 140 मिलियन व्ह्यूज

असा रेकॉर्ड कोणीच केला नाही, 2026 मधील या गाण्याने ‘धुरंधर 2’ ला टाकलं मागे, मिळाले 140 मिलियन व्ह्यूज
असा रेकॉर्ड कोणीच केला नाही, 2026 मधील या गाण्याने ‘धुरंधर 2’ ला टाकलं मागे, मिळाले 140 मिलियन व्ह्यूज


Youtube Trending Song: सध्या यूट्यूबवर आणि सोशल मीडियावर अनेक मोठ्या चित्रपटांची गाणी ट्रेंड होताना दिसत आहेत. विशेषत ‘धुरंधर 2’ चित्रपटातील गाण्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड चर्चा मिळवली आहे. मोठं बजेट, स्टारकास्ट आणि जोरदार प्रमोशनमुळे ही गाणी सतत चर्चेत आहेत. मात्र, या सगळ्या मोठ्या गाण्यांच्या गर्दीत एक असं गाणं समोर आलं आहे ज्याने कोणत्याही मोठ्या स्टारशिवाय आणि फिल्मी बॅकग्राउंडशिवाय इंटरनेटवर अक्षरश धुमाकूळ घातला आहे.

हे गाणं आहे ‘बैरण’. अवघ्या 2 मिनिटे 30 सेकंदांच्या या गाण्याने रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर जबरदस्त लोकप्रियता मिळवली आहे. विशेष म्हणजे हे गाणं कोणत्याही चित्रपटाचं नाही आणि यात कोणताही प्रसिद्ध गायकही नाही. तरीसुद्धा लोक या गाण्यावर अक्षरशः फिदा झाले आहेत. इंस्टाग्राम रील्सपासून यूट्यूब शॉर्ट्सपर्यंत सर्वत्र या गाण्याचा ट्रेंड पाहायला मिळतो आहे.

ना कलाकार, ना प्रमोशन

‘बैरण’ गाणं रिलीज होऊन जवळपास तीन महिने झाले असले तरी त्याची क्रेझ अजूनही कायम आहे. लोक हे गाणं वारंवार ऐकत आहेत आणि त्यावर मोठ्या प्रमाणात रील्स तयार करत आहेत. गाण्याची धून, त्यातील शब्द आणि वेगळं सादरीकरण यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे.

2026 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक वेळा पाहिलेल्या गाण्यांमध्ये ‘बैरण’चा समावेश झाला आहे. विशेष म्हणजे ज्या काळात मोठमोठ्या चित्रपटांच्या गाण्यांना ट्रेंड करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचं प्रमोशन केलं जातं, त्या काळात ‘बैरण’ने केवळ लोकांच्या पसंतीच्या जोरावर ही लोकप्रियता मिळवली आहे. कोणताही मोठा चेहरा नाही, मार्केटिंग टीम नाही, तरीही हे गाणं इंटरनेटवर सतत व्हायरल होत आहे.

धुरंधर 2 मधील गाण्यांना टाकलं मागे

हे एक हरियाणवी गाणं असून यूट्यूबवर याला 140 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळालेल्या व्ह्यूजमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण आजच्या काळात मोठ्या स्टार्सच्या गाण्यांनाही इतक्या सहजपणे एवढे व्ह्यूज मिळत नाहीत. अनेकदा अशा गाण्यांच्या प्रमोशनसाठी मोठी मार्केटिंग टीम काम करत असते. मात्र, ‘बैरण’ने कोणत्याही मोठ्या प्रचाराशिवाय ही कामगिरी करून दाखवली आहे.

रणवीर सिंगच्या ‘धुरंधर 2’ चित्रपटातील गाण्यांची या वर्षी मोठी चर्चा झाली होती. चित्रपट सुपरहिट ठरला असला तरी त्यातील गाण्यांना अद्याप 100 मिलियन व्ह्यूजचा टप्पाही पार करता आलेला नाही. दुसरीकडे ‘बैरण’ने 140 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *