Headlines

ENG vs IND : इंग्लंड दुसऱ्या सामन्यासाठी तयार, इंडिया विरूद्धच्या मॅचसाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर

ENG vs IND : इंग्लंड दुसऱ्या सामन्यासाठी तयार, इंडिया विरूद्धच्या मॅचसाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर
ENG vs IND : इंग्लंड दुसऱ्या सामन्यासाठी तयार, इंडिया विरूद्धच्या मॅचसाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर


इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील टी 20I मालिकेतील पहिला सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांना उभयसंघातील दुसऱ्या सामन्याची प्रतिक्षा आहे. दुसरा टी 20I सामना हा शनिवारी 4 जुलैला होणार आहे. इंग्लंडने या दुसऱ्या सामन्यासाठी परंपरेनुसार 24 तासांआधी प्लेइंग ईलेव्हनची घोषणा करत आपण तयार असल्याचं जाहीर केलंय. हॅरी ब्रूक इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. इंग्लंड क्रिकेटने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. उभयसंघातील दुसरा सामना हा शनिवारी मँचेस्टरमधील एमिरेट्स ओल्ट ट्रॅफर्ड मैदानात होणार आहे.

इंग्लंडकडून प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल

इंग्लंड दुसऱ्या टी 20i सामन्यात नव्या प्लेइंग ईलेव्हनसह मैदानात उतरणार आहे. इंग्लंडने वेगवान आणि प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चर याचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश केला आहे. तर इंग्लंडकडून एका खेळाडूचं पदार्पण होणार आहे. जोश टंग याचं टी 20i पदार्पण होणार आहे. तर ल्यूक वुड आणि साकीब महमूद या दोघांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

पहिला सामना पावसाने जिंकला

उभयसंघातील सामना हा पहिल्या डावानंतर पावसामुळे रद्द करावा लागला होता. पहिला सामना हा 1 जुलैला चेस्टर ली स्ट्रीटमध्ये खेळवण्यात आला होता. भारताने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. भारताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 189 धावा केल्या होत्या. भारताला इथवर पोहचवण्यात अभिषेक शर्मा आणि कर्णधार श्रेयस अय्यर या दोघांनी प्रमुख भूमिका बजावली होती. अभिषेक आणि श्रेयसने अर्धशतक झळकावलं होतं. तर शिवम दुबे याने 40 पेक्षा अधिक धावा करत फिनिशिंग टच दिला होता. मात्र पहिला डाव आटोपल्यानंतर पावसामुळे खेळच झाला नाही. पावसाच्या वाढत्या जोरामुळे सामना नाईलाजाने रद्द करण्यात आला. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्याची चाहत्यांना ओढ लागली आहे.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : फिल सॉल्ट, जोस बटलर, हॅरी ब्रूक, जेकब बेथल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, लियम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदील रशीद आणि जॉश टंग.

दरम्यान उभयसंघातील सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. पहिल्या टी 20i सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता सुरुवात झाली होती. त्यामुळे क्रिकेट प्रेमींना झोपमोड करावी लागली होती. मात्र दुसऱ्या सामन्यात तसं होणार नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *