Headlines

Nandurbar Weather Update | उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर

Nandurbar Weather Update | उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
Nandurbar Weather Update | उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर


नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेचा तीव्र कहर पाहायला मिळत असून, तापमानाचा पारा तब्बल 45.5 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. वाढत्या तापमानामुळे अनेक वर्षांचे उष्णतेचे विक्रम मोडले गेल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत असून, दैनंदिन जनजीवनावरही त्याचा परिणाम होताना दिसत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस नंदुरबारमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच दुपारच्या वेळेत उन्हात जाणे टाळावे, असा सल्लाही देण्यात आला आहे. उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेमुळे शहरातील रस्तेही निर्मनुष्य झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक नागरिकांनी दुपारच्या वेळेत घरातच राहणे पसंत केले असून, बाजारपेठांमध्येही तुलनेने कमी वर्दळ दिसून येत आहे.
दरम्यान, उष्माघाताचा धोका लक्षात घेता नागरिकांनी भरपूर पाणी पिणे, डोक्यावर संरक्षण ठेवणे आणि आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *