Headlines

Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग या दोन गोष्टींची कधीच लाज बाळगू नका, चाणक्य काय सांगतात?

Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग या दोन गोष्टींची कधीच लाज बाळगू नका, चाणक्य काय सांगतात?
Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग या दोन गोष्टींची कधीच लाज बाळगू नका, चाणक्य काय सांगतात?


आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगित्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठारतात. चाणक्य यांना त्यांच्या आयुष्यात जे काही अनुभव आले, त्या अनुभवाचं थोडक्यात सार त्यांनी या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आपण आपल्या आयुष्यात खूप मोठं व्हावं, प्रचंड नाव कमावावं, लोकांनी आपला सन्मान करावा, आपल्याकडे एवढा पैसा असावा की आपल्याला आपल्या कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण करता आल्या पाहिजे. परंतु चाणक्य म्हणतात की हे यश तुम्हाला कधीच एका दिवसामध्ये प्राप्त होत नाही, त्यासाठी तुम्हाला प्रचंड कष्ट करावे लागतात. यशाला कोणताही शॉर्टकट नसतो. जर तुम्हाला तुमच्या आयुष्या यशस्वी व्हायचं असेल तर या जगात अशा दोन गोष्टी आहेत, ज्यांना तुम्ही कधीच लाजलं नाही पाहिजे, तर आणि तरच तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हाल. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

कष्ट – आर्य चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्ही एखादं उद्दिष्ट ठरवतात, तेव्हा ते पूर्ण करण्यासाठी प्रचंड कष्ट करण्याची तुमची तयारी पाहिजे, कष्टाला कधीही लाजू नका, लक्षात ठेवा जो व्यक्ती कष्ट करायला लाजतो, तो व्यक्ती आपल्या आयुष्यात कधीही यशस्वी होत नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. तुम्ही जेवढे जास्त कष्ट कराल तेवढी तुमची जास्त प्रगती होईल, त्यामुळे कष्टाला लाजू नका असा सल्ला चाणक्य देतात.

अज्ञान लपवू नका- चाणक्य म्हणतात तुम्हाला जर प्रगती करायची असेल तर तुम्ही ज्या क्षेत्रात काम करणार आहात, त्या क्षेत्रातील तुम्हाला एखादी गोष्टी माहिती नसेल तर ती लपवू नका, किंवा तिच्याबद्दल ज्ञान घेताना लाजू नका, तर आणि तरच तुमची प्रगती होईल असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *