Headlines

PM Modi : भारत-स्वीडन संबंधांचा एक नवा अध्याय.. पंतप्रधान मोदींनी केली खास पोस्ट शेअर !

PM Modi : भारत-स्वीडन संबंधांचा एक नवा अध्याय.. पंतप्रधान मोदींनी केली खास पोस्ट शेअर !
PM Modi : भारत-स्वीडन संबंधांचा एक नवा अध्याय.. पंतप्रधान मोदींनी केली खास पोस्ट शेअर !


PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वीडन दौरा अत्यंत यशस्वी ठरला. या दौऱ्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’वर (पूर्वीच ट्विटर) एक खास पोस्ट लिहीली. या दौऱ्यामुळे दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंधांना नवी दिशा आणि अधिक गती मिळाल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं. या भेटीदरम्यान झालेल्या चर्चा अत्यंत फलदायी झाल्या असून भारत-स्वीडनमधील संबंध अधिक उंचावण्यासाठी त्या चर्चा महत्त्वपूर्ण ठरतील, असंही पंतप्रधानांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

दौऱ्यातील मुख्य मुद्दे :

धोरणात्मक भागीदारी : भारत आणि स्वीडन यांच्यातील संबंधांना नव्या स्तरावर नेत “धोरणात्मक भागीदारी” (Strategic Partnership) म्हणून अधिक बळकटी देण्यात आली.

जॉइंट इनोव्हेशन पार्टनरशिप 2.0 : विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी “Joint Innovation Partnership 2.0” अधिकृतपणे सुरू करण्यात आले.

तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता कॉरिडॉर : अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या क्षेत्रांमधील नवीन नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी “भारत-स्वीडन तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता कॉरिडॉर” (“India-Sweden Technology and Artificial Intelligence Corridor”) सुरू करण्यात आला आहे.

व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष्य: पुढील पाच वर्षांत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य निश्चित करण्यात आले.

यावेळी Ulf Kristersson तसेच स्वीडन सरकार आणि तेथील जनतेने दिलेल्या आदरातिथ्याबद्दल आणि मैत्रीपूर्ण वातावरणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष आभार मानले.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *