Headlines

राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?

राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?


गेल्या अनेक दिवसांपसून राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी पक्षाचीच चर्चा आहे. कार्यकारणींच्या यादीमुळे मोठा गैरसमज सुरु झाल्याचं सांगितलं जात होतं. आता तसंच प्रकरम शिंदेंच्या शिवसेनेतही सुरु झालं की काय? अशी शंका उपस्थित झाली आहे.

शिवसेना नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघाचा या बैठकीत आढावा घेतला जात आहे. पक्ष संघटन कसे मजबूत केले जाईल याबाबत बैठकीत मंथन गोत आहे. आगामी जिल्हा परिषद आणि स्थानिक विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात देखील बैठकीत आढावा घेतला जात आहे. मात्र या बैठकीला नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी दांडी मारली आहे.

शिवसेनेच्या नाशिकमधील बैठकीला हेमंत गोडसे अनुपस्थित आहेत. त्यामुळे हेमंत गोडसे शिनसेनेत नाराज तर नाहीत ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. ते गैरहजर असल्याने राज्यातील पहिल्याच बैठकीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. नव्या कार्यकारणीत संधी न दिल्याने गोडसे नाराज असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. हेमंत गोडसे नाशिकमध्ये असूनही बैठकीला न आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहेत. कारण या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे आणि अनेक आमदार-खासदार, नगराध्यक्ष, उपमहापौर, नगरसेवक उपस्थित आहेत, मात्र गोडसे गैरहजर असल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *