Headlines

Makrand Anaspure On Onnion Farmer | विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव; शेतकऱ्यांच्या वेदनेवर मकरंद अनासपुरे भावुक

नागपूरच्या रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात आयोजित ‘जलक्रांती’ परिषदेत अभिनेता आणि नाम फाऊंडेशनचे अध्यक्ष मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य करत गंभीर चिंता व्यक्त केली. या परिषदेला पाणी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेता आमिर खान, अभिनेते नाना पाटेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मकरंद अनासपुरे यांनी नाम फाऊंडेशनच्या देशभरातील कामांचा आढावा घेतला. “2016 मध्ये नागपूर जिल्ह्यातील कोही टाकली गावात 70 एकर परिसरात तलाव बांधण्यात आला. त्यानंतर 250 एकर जमीन ओलिताखाली आली. आतापर्यंत 2 हजार 887 गावांमध्ये वॉटर बॉडीचं काम करण्यात आलं असून याचं मोठं श्रेय नाना पाटेकर यांना जातं,” असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांवर बोलताना अनासपुरे म्हणाले, “विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते आणि कांदा उत्पादकांना योग्य भाव मिळत नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे.” यवतमाळमधील एका शेतकऱ्याला मदत करून त्याचं आयुष्य बदलल्याचं उदाहरणही त्यांनी दिलं.
तसेच सामूहिक प्रयत्नांमुळे समाजात मोठे बदल घडू शकतात, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी पर्यावरण आणि नदी स्वच्छतेच्या कामांचाही उल्लेख केला.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *